
Yeola BJP news : शहरातील पुरग्रस्तांना शासकीय मदतीच्या धनादेशांचे वितरण एका खाजगी कार्यालयातून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. हे धनादेश वाटप करतांना शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे. (Government relief cheques distributed from a private office)
येवला (Yeola) शहरात अतिवृष्टीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले. त्यासाठी राज्य शासनातर्फे (Maharashtra Government) त्यांना मदत जाहीर करण्यात आली. मात्र मदतीचे हे धनादेश आमदारांच्या खाजगी कार्यालयातून वितीरत झाल्याची भाजपची (BJP) तक्रार आहे.
प्रांताधिकारी कार्यालयातील हिरा शंकर हिरे यांनी हे निवेदन स्वीकारले. पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सहाय्य म्हणून वाटप करण्यात आलेले धनादेश शासकीय नियमांचे उल्लंघन करीत थेट आमदार कार्यालयातून वितरीत करण्यात आले याची सखोल चौकशी करून उचीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहरात २०२२ मधील पावसाळ्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीचे शासकीय पंचनामे व चौकशी होऊन शासनाने मदत जाहीर केली. शासकीय मदत असतांना या मदतीचे धनादेश सर्व शासकीय नियमांचे उल्लंघन करीत खाजगी कार्यालयातून लाभ पोहचवण्याचा हेतूने बेकायदेशीररित्या वाटप करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. लोकप्रतिनिधींच्या खाजगी कार्यालयात शासकीय अधिकाराचा गैरवापर करीत मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यासाठी अधिकारी का व कसे तयार झाले असा सवाल त्यांनी केली.
करून लोकप्रतीनिधींच्या संगनमताने व दबावाने असे कृत्य करणे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.या बाबत सखोल चौकशी करण्यात येऊन संबंधित दोषींवर उचित कडक स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे.दरम्यान,नुकसानीत पूरग्रस्तांना सहाय्यता मिळावी म्हणून भाजपने सतत पाठपुरावा केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने या लोकांना मदत देवून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, ओबीसी जिल्हा सरचिटणीस राजूसिंग परदेशी, तालुकाध्यक्ष डॉ नंदकिशोर शिंदे, तालुका संघटन सरचिटणीस नानासाहेब लहरे, युवा नेते युवराज पाटोळे, गणेश गायकवाड, संतोष काटे, सुनील सोमासे, महेशकुमार पाटील, लक्ष्मण सुरासे, कृष्ण कवर, दत्ता सानप आदी यावेळी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.