सरकारी कर्मचारी शंभर रुपयाची लाच देखील सोडेना!

धुळे येथे लाचखोर अव्वल कारकून ‘एसीबी’च्या जाळ्यात
सरकारी कर्मचारी शंभर रुपयाची लाच देखील सोडेना!
Ganesh Pingle News, Dhule Latest Marathi News Sarkarnama

चिमठाणे : मतदार यादीतील नावात दुरुस्तीसाठी शंभर रुपयांची लाच घेणाऱ्या शिंदखेडा (Dhule) तहसील कार्यालयातील अव्वल कारकून गणेश दिगंबर पिंगळे यास बुधवारी लाच स्वीकारताना पकडण्यात आले. (ACB) भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढत असताना शासकीय कर्मचारी आता शंभर रुपयेही सोडायला तयार नाही, अशी स्थिती असल्याचे चित्र आहे. (Now employee deemands even 100 Rs bribe)

Ganesh Pingle News, Dhule Latest Marathi News
पोलिस आयुक्तांनी उधळला पेटवापेटवीचा डाव!

वरसुस (ता.शिंदखेडा) येथील तक्रारदाराने त्यांच्या आईचे नाव मतदार यादीत चुकीचे नमुद झाल्याने मतदान व निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म भरण्यास अडचणी येत होत्या. मतदार यादीत आईचे नाव दुरुस्त करण्यासाठी दोन्ही नावांच्या व्यक्ती एकच असल्याबाबत शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करण्याकरिता तक्रारदार बुधवारी शिंदखेडा तहसिल कार्यालय येथे गेले असता तेथे हजर असलेले अव्वल कारकून गणेश पिंगळे यांनी प्रतिज्ञापत्रावर सही करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून शंभर रुपये लाचेची मागणी केली. (Dhule Latest Marathi News)

Ganesh Pingle News, Dhule Latest Marathi News
शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची नाशिकला जय्यत तयारी

तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दुरध्वनीद्वारे तक्रार दिली, लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पथकाने शिंदखेडा येथे जाऊन तक्रारदार यांची भेट घेवुन त्यांची तक्रार नोंदवून पडताळणी केली. यात अव्वल कारकून गणेश पिंगळे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडे शंभर रुपये लाचेची मागणी करीत स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम शिंदखेडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, संतोष पावरा, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in