राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची कचरागाडीतून रवानगी!

राज्यातील बहुचर्चीत छत्रपती शिवजन्मोत्सव समितीने केले चाकोरीबाहेरचे आंदोलन.
Agitation against Governer
Agitation against GovernerSarkarnama

नाशिक : राज्यपालांविरोधात (Governer Bhagatsingh Koshyari) सर्व स्तरांत वातावरण तापू लागले आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे त्यांचा निषेध (Protest) करण्यात आला. यावेळी झालेल्या आंदोलनात राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची रवानगी चक्क कचऱ्याच्या गाडीत करण्यात आली. या चाकोरीबाहेरच्या आंदोलनात सर्व पक्षाच्या नेते सहभागी झाले. (All party leaders protest against Governer Bhagatsingh Koshyari in Nashik Road)

Agitation against Governer
शिंदे गटाला मिळेना प्रतिसाद; नेत्यांची झाली कोंडी!

आपल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांसाठी राज्यभर नावलौकीक असलेल्या नाशिक रोडच्या छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव समितीने त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी राज्यपालांचा प्रतिकात्मक पुतळा चक्क महापालिकेच्या कचरा गाडीत टाकून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

Agitation against Governer
अनोखे आंदोलन; कोश्‍यारींच्या विधानाचा धोतर जाळून निषेध

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. नाशिकला जवळ जवळ सर्व शहरांत याबाबत निषेध आंदोलन झाले. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना भाजपच्या नेत्यांशी करण्यात आली. त्यात छत्रपती जुन्या काळातील आदर्श होते, असे विधान केले आहे. अशी विधाने करण्याआधी राज्यपालांनी किमान महाराष्ट्राची तरी माहिती घेतली असती तर बरे झाले असते. मात्र तसे झालेले नाही.

दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते त्याहीपुढे जात छत्रपतींचा अवमान करत आहेत. खेदाची बाब म्हणजे एरव्ही किरकोळ व काल्पनिक विषयावर हिरीरीने निषेध व महाविकास आघाडीवर टिका करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा समयी देखील महाराष्ट्राची व छत्रपती शिवाजी महाराजांची नव्हे तर राज्यपालांच्या विधानावर सारवा सारव करीत आहेत. याचा खेद वाटतो, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे संस्थापक बंटी भागवत, शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निवृत्ती अरिंगळे, विभागीय अध्यक्ष मनोहर कोरडे, माजी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दिवे, नितीन चिडे, समितीचे माजी अध्यक्ष विक्रम कोठुळे, राजेश फोकणे, शिवाजी हांडोरे, किशोर जाटक, छोटू ताजनपुरे, अतुल धोंगडे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com