Nashik News: राज्यपाल ज्या ताटात जेवले त्यातच थुंकले!

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला संताप व टीका.
Bhagatsingh Koshyari & Anita Bhamre
Bhagatsingh Koshyari & Anita BhamreSarkarnama

नाशिक : महाराष्ट्रातील (Maharashtra) मराठी माणसाचा अपमान करतांना राज्यपाल (Governer) भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshiyari) ज्या ताटात जेवले त्याच ताटात थुंकले, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेस (NCP) नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी केली आहे. (NCP women wing protest against Governer Bhagatsing Koshiyari)

Bhagatsingh Koshyari & Anita Bhamre
Dhule: नव्या सरकारकडून धुळे शहराच्या विकासाला गती

मुंबईत अंधेरी येथे झालेल्या कार्यक्रमात श्रीमती शांतीदेवी कोठारी चौक नामकरण सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. समारंभात बोलताना कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराथी आणि राजस्थानी माणूस वगळला तर मुंबईचे अस्तित्व राहणार नाही. मुंबईत पैसा राहणार नाही. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी देखील राहणार नाही असे भंपक विधान केले. कोश्यारींनी मुंबईचाच नव्हेतर समस्त मराठी माणसाचा अपमान केला आहे.

Bhagatsingh Koshyari & Anita Bhamre
Shivsena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रक्षाबंधनाला अनोखी भेट!

यातून त्यांच्या मनात असलेला महाराष्ट्र व मराठी माणसाविषयीचा द्वेष दिसून येतो. जर त्यांना मराठी माणसांचा एव्हढा द्वेष व भाजप विषयी प्रेम असेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा त्याग करावा. भाजपने त्यांना नेमले आहे. ही नेमणूक करतांना त्यांनी विचापूर्वकच हा निर्णय गेतला असावा. त्यामुळे राज्यपालांचे बोलविते धनी कोण आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

यापूर्वी देखील राज्यपाल यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या महान विभूतींविषयी असेच बाष्कळ विधान केले होते. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक, शिक्षण व विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. वादातीत आहे. त्याचा जगभर आदर केला जातो. त्यांच्याविषयी जे राज्यपाल वादग्रस्त विधान करू शकतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी, असा प्रश्न अनिता भामरे यांनी केला.

त्या म्हणाल्या, कोश्यारी साहेब आपण महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहात. या स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे. या मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले आहे. आपण गुजराथी आणि राजस्थानी माणसाचे कौतुक करतांना समस्त महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान केला असून ज्या ताटात जेवले त्याच ताटात आपण थुंकले आहात. त्यामुळे थोडा जरी आपल्या रक्तात स्वाभिमान शिल्लक असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणसाची माफी मागा अन्यथा चालते व्हा.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com