राज्यपाल म्हणाले, ‘भोंगा लगाओ या न लगाओ, मैं क्या बोलू?’

नाशिकमध्ये रंगलेल्या भोंग्याप्रश्नी उपमुख्यमंत्री कठोर तर राज्यपालांचे कानावर हात.
Governer Bhagatsingh Koshiyari
Governer Bhagatsingh KoshiyariSarkarnama

नाशिक : मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न (Loudspeaker) चर्चेला आला नाही असे सध्या होत नाही. राज्यपाल (Governer) भगतसिंह कोश्‍यारी (Bhagatsingh kosiyari) यांनाही त्यावर बोलावेच लागले. ‘भोंगा लगाओ या न लगाओ, आपका मामला है वो, उसमें मैं क्या बोलू?’ असे म्हणत राज्यपालांनी कायदा-सुव्यवस्था हा राज्य सरकारचा (State Government) विषय असल्याचे स्पष्ट केले.

Governer Bhagatsingh Koshiyari
जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या!

यापूर्वी मनसेचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या नाशिक या धार्मिकनगरीमध्ये ‘भोंगा’यण सोमवारी चांगलेच रंगले. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरणानिमित्त झालेल्या कार्यक्रमात देखील त्याची चर्चा झाली. यावेळी अगदी राज्यपालांना देखील पत्रकारांनी या विषयावर छेडले असता, त्यांनी ‘भोंगा लगाओ या न लगाओ, आपका मामला है वो, उसमें मैं क्या बोलू?’ असे म्हणत हात झटकले.

Governer Bhagatsingh Koshiyari
संसार उभारायला अक्कल लागते, धुडगूस घालायला नाही!

`मनसे`प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याप्रश्‍नी दिलेल्या इशाऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हुकूमशाही चालणार नाही आणि कायद्याच्या विरोधात वागल्यास पोलिस कारवाई करतील, असा इशारा दिला.

श्री. पवार यांनी भोंग्याच्या विषयाला हात घातला. ते म्हणाले, की भोंगा वाजवा, भोंगा काढा यातून नोकरी मिळणार की रोजीरोटी, हा खरा प्रश्‍न आहे. आताचे प्रश्‍न सोडून जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशामध्ये मशिदीवरील भोंगा काढल्याचे म्हटले जाते. पण त्याच वेळी पहाटे मंदिरावरील सुरू असलेला ध्वनिक्षेपक बंद झाला आहे, याकडे लक्ष वेधले.

श्री. पवार म्हणाले, की न्यायालयाने ध्वनिक्षेपकाचा आवाज किती असावा हे स्पष्ट केले आहे. लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार असला, तरीही कायदा-सुव्यवस्था अडचणीत येणार असेल, तर पोलिस त्यांचे काम करतीलच. घरी बसून अथवा सभेत बोलायला काय जाते? चिथावणीखोर भाषण करून भडकावणे सोपे आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com