बाळासाहेबांची शिवसेना, भाजप व मनसेची युती होणार?

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये दिले राजकीय संकेत.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

नाशिक : आगामी महापालिका (NMC) निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाळासाहेबांची शिवसेना, (Shivsena) भारतीय जनता पक्ष (BJP) व मनसेची (MNS) युती होण्याचे संकेत राज्याचे ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शनिवारी नाशिकमध्ये दिले. (All three party of BJP freinds will come togather inUpcoming NMC election)

Girish Mahajan
मंत्रीपदाचे काय, मी स्वतःला मुख्यमंत्री समजतो!

त्र्यंबकेश्वर येथे दर्शनानिमित्त श्री. महाजन आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राजकारणात काहीच अशक्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे दिवाळीनिमित्त एकत्र आले असले तरी याच्याकडे राजकारण म्हणून बघणे योग्य नाही. मात्र राजकारणात काही अशक्य नसते, अशी पुष्टी जोडत महाजन यांनी आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप, शिंदे गट व मनसे युतीचे संकेत दिले.

Girish Mahajan
अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत

भाजप व मुख्यमंत्री शिंदे आम्ही एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पक्ष युती संदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील. त्याचबरोबर मुंबई महापालिकेत यंदा भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

महामार्गावरील खड्डे अधिक का दिसले नाही

राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून व्यथित झाले असून, खड्डे दुरुस्त न झाल्यास टोल बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र नाशिकचे पालकमंत्री असताना टोल बंद करण्याचा निर्णय भुजबळ यांनी घेतला असता तर बरे झाले असते, असा टोला लगावताना महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

नार्वेकर नाराज

मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज आहे, तसेच त्यांचे अमित शहा यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कोण राहतील, हे आता सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com