गिरीश महाजनांनी अद्वय हिरेंकडे नेतृत्व सोपवून `राष्ट्रवादी`ला साईड ट्रॅक केले

मालेगावमध्ये भाजपापासून दुरावलेल्या अद्वय हिरेंना पुन्हा सक्रीय केले आहे.
Girish Mahajan, Adway Hire & Sunil Gaikwad
Girish Mahajan, Adway Hire & Sunil GaikwadSarkarnama

मालेगाव : राष्ट्रवादी काँग्रेसने महत्वाच्या नेत्यांचे प्रवेश घडवून काँग्रेसची अडचण केली. मात्र भाजप नेते गिरीश महाजन (BJP leader Girish Mahajan) यांनी मास्टरस्ट्रोक मारून अद्वय हिरे यांच्याकडे भाजपचे नेतृत्व सोपवले. अद्वय हिरे (Adway Hire) व सुनील गायकवाड (Sunil Gaikwad) यांच्यातील मतभेद संपुष्टात आले आहेत. श्री. हिरे सक्रिय झाल्याने आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप व शिवसेना यांच्यात कडवा मुकाबला पहायला मिळेल. त्याचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसणार आहे.

Girish Mahajan, Adway Hire & Sunil Gaikwad
माझ्याकडे १८, १९ रेड झाल्या, रेड वेळी पत्नी नातवांसह दिवसभर मॅालमध्ये बसून रहायची!

मालेगाव तालुका व परिसरातील आगामी सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष युवानेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. श्री. हिरे यांनी भाजप पक्ष सोडला नाही. नियोजित मालेगाव जिल्ह्यातील पक्षाची धुरा तेच सांभाळतील. सर्व निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. भाजप गटनेते सुनील गायकवाड व श्री. हिरे यांच्यात असलेले गैरसमज दूर झाले आहेत, असे माजीमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Girish Mahajan, Adway Hire & Sunil Gaikwad
दिल्लीच्या ऊर्जा मंत्रालयाचे संचालक मिलींद देवरेंनी घेतला म्हसदी गावाच्या विकासाचा ध्यास!

श्री. महाजन, माजीमंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत श्री. हिरे, श्री. गायकवाड, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार यांच्यात जळगाव येथे गोपनीय ठिकाणी बैठक झाली. त्यावेळी श्री. महाजन यांनी वरीलप्रमाणे सूचना केल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. बैठकीत नियोजित मालेगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, बाजार समिती, शेतकरी संघ आदी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका श्री. हिरे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. या वेळी श्री. महाजन व श्री. रावळ यांनी हिरेंकडे सोपविलेल्या जबाबदारीचे स्पष्टीकरण देताना अद्वय हिरे यांनी भाजप पक्ष सोडला नव्हता, असे सांगितले. श्री. गायकवाड व श्री. हिरे यांच्यात गैरसमज व मतभेद होते. ते दूर झाले असून, हिरे यांच्या सक्रियतेमुळे भाजप नियोजित मालेगाव जिल्ह्यात पुन्हा बळकट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. हिरे म्हणाले, की मी पक्ष सोडलाच नव्हता, फक्त तटस्थ होतो. भाजपने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून सगळ्याच निवडणुकीत पक्षाचा झेंडा फडकवणार आहे. सुनील गायकवाड व माझ्यातील गैरसमजुतीमधून मतभेद होते. ते आता दूर झाले असून, आम्ही एकदिलाने पक्ष बळकट करणार आहोत. श्री. गायकवाड म्हणाले, की आमच्यात आता कोणताही दुरावा नाही. सर्व पदाधिकारी श्री. हिरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत. नेत्यांच्या शिष्टाईचे काम दीपक पवार यांनी केले. माझी शिष्टाई फळाला आली असून, ही राम-लक्ष्मणाची जोडी म्हणजे दोन्ही आबा पक्षाला नेत्रदीपक यश नक्कीच प्राप्त करून देतील, असे त्यांनी सांगितले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com