Girish Mahajan: गिरीश महाजन यांनी पुसले पूरग्रस्तांचे अश्रू!

सिन्नरला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नरला पुरग्रस्तांची भेट घेऊन केली नुकासानीची पाहणी
Girish Mahajan At Sinner
Girish Mahajan At SinnerSarkarnama

सिन्नर : ढगफुटीसदृश्य (cloudburst) पावसाने गुरुवारी व शुक्रवारी सिन्नर (Sinner) शहरासह तालुक्यात दुकाने, शेती, घरांचे कधी न भरून निघणारे नुकसान झालेले आहे. या आपदग्रस्तांना आज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि जिल्हाधिकारी डी. गंगाथरण (D. Gangatharan) यांनी भेट देत दिलासा दिला. (Sinner city affected of flood will get assistance soon)

Girish Mahajan At Sinner
Maharashtra Politics| राज्यात जातीय दंगलीची शक्यता; भास्कर जाधवांचे सूचक विधान

तालुक्यातील तसेच शहरातील नुकसानग्रस्त कुटुंबे, दुकाने यांची महाजन यांनी पाहणी करून येत्या सोमवापर्यंत भरीव मदत दिली जाईल असे आश्‍वासित केले. श्री. महाजन यांनी तालुक्यातही काही गावांना भेट देत शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.

Girish Mahajan At Sinner
MVP Election: छगन भुजबळांकडून मविप्र पदाधिकाऱ्यांचा सत्कार

पावसामुळे कोट्यवधीच्या मालमत्तेचे नुकसान झालेले असून त्यांचे नव्वद टक्के पंचनामे झाले आहेत. पुराच्या पाण्यात अनेकांचे संसार दुकाने वाहून गेल्याने अशा कुटुंबांना मंगल कार्यालय व शाळेमध्ये राहण्याची व जेवण्याची सोय करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. जी काही मदत लागेल, ती सर्व शासन स्तरावर करण्यात येईल याची ग्वाही नुकसानग्रस्तांना दिली.

सरस्वती नदीला आलेल्या महापुरामुळे शहरातील अनेक दुकानांसह व्यावसायिकांसह जवळपास शेकडोवर कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. शहरासह तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पाहणी करत व्यावसायिकांसह काही कुटुंबाना भेट दिल्यानंतर श्री. महाजन यांनी शासनाकडून संपूर्ण मदत मिळण्याचे आश्वासन माध्यमांसमोर बोलताना दिले. शहरासह तालुक्यात आठ रस्ते वाहून गेले तर तीन पूल खचले आहेत. शहरात तब्बल १६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे सरस्वती नदीने रौद्ररुप धारण केल्याने नदीकाठचा जवळपास शंभर फुटांचा परिसर पाण्याच्या कचाट्यात सापडला. पूर ओसरल्यानंतर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य बघायला मिळाले. नुकसानीचा आकडाही करोडेंच्या घरात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, प्रभारी तालुकाध्यक्ष जयंत बापू आव्हाड, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे, बंडूनाना भाबड, सविता कोठुरकर, पप्पू कपुर, जिल्हाधिकारी गंगाधरण डी, प्रांताधिकारी अर्चना पठारे, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.

नागरिकांचे पूर्नवर्सन करण्यासाठी शासकीय भूखंड घेऊन त्यांना पर्यायी घरे बांधून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करु.

- गिरीश महाजन, पालकमंत्री

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in