गिरीश महाजनांची ऑफर नाकारल्याने राजकीय सुडापोटी खोट्या गुन्ह्यात अडकवले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवीदास पिंगळे यांची `एसीबी`च्या खटल्यातून निर्दोष मुक्तता!
गिरीश महाजनांची ऑफर नाकारल्याने राजकीय सुडापोटी खोट्या गुन्ह्यात अडकवले!
Girish Mahajan & Devidas PingleSarkarnama

नाशिक : तत्कालीन पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) नाशिकचे पालकमंत्री होते. त्यांनी मला भाजपमध्ये (BJP) येण्याची गळ घातली. ही ऑफर धुडकावल्याने महाजन यांनी सत्तेचा दुरूपयोग करीत मला खोट्या गुन्ह्यात अडकवले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व माजी खासदार देवीदास पिंगळे (Devidas Pingle) यांनी केला आहे.

Girish Mahajan & Devidas Pingle
`राष्ट्रवादी`चे नेते देवीदास पिंगळे निर्दोष!

श्री. पिंगळे यांची काल `एसीबी`ने दाखल केलेल्या अपहाराच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. यावेळी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना श्री. पिंगळे यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली. ते म्हणाले, तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपमध्ये येण्याची गळ घातली होती. परंतु, ही ऑफर धुडकावत मी स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे महाजन यांनी सत्तेचा दुरुपयोग करून राजकीय सूडबुद्धीतून माझ्यासह माझ्या कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. आमची बाजू सत्याची होती आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता. त्यामुळे सुडाच्या राजकारणात राजकीय विरोधक सपशेल अपयशी ठरले.

Girish Mahajan & Devidas Pingle
राज ठाकरेंना इशारा... तर हातातल्या बांगड्या काढायाल वेळ लागणार नाही

नाशिक कृषी उपन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढीव महागाईभत्ता फरकाच्या रकमेच्या अपहार प्रकरणी समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यासह चौघा कर्मचाऱ्यांची नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ ऑक्टोबर २०१६ ला एक कार (एमएच १५, सीएम २१८०) पकडली होती. या कारमध्ये सापडलेली ५७ लाख ७३ हजार ८०० रुपये रोकड जप्त करण्यात आली होती. नाशिक बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढीव महागाईभत्ता फरकाच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी तत्कालीन सभापती देवीदास पिंगळे, लिपिक दिनकर हिरामण चिखले, अकाउंटंट अरविंद जैन, स्टेनो विजय निकम यांच्यावर म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

देवीदास पिंगळे यांना तीन महिने मध्यवर्ती कारागृहात काढावी लागली होती. २८ फेब्रुवारी २०१७ ला दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा वर्षांपासून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. दरम्यान, बुधवारी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षातर्फे जवळपास १७ साक्षीदार तपासण्यात आले. अखेर न्यायालयाने देवीदास पिंगळे यांच्यासह लिपिक दिनकर चिखले, अकाउंटंट अरविंद जैन, स्टेनो विजय निकम या चौघांची निर्दोष मुक्तता केली. देवीदास पिंगळे यांच्यातर्फे ॲड. मंदार भानोसे, तर उर्वरित चिखले, जैन आणि निकम या तिघांतर्फे ॲड. अविनाश भिडे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे ॲड. सुधीर कोतवाल यांनी बाजू मांडली.

नाशिकसह अवघ्या सहकार व राजकीय क्षेत्राचे या खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागून होते. दरम्यान, न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता आणि अखेर सत्याचाच विजय झाला, अशी प्रतिक्रिया माजी खासदार पिंगळे यांनी निकालानंतर व्यक्त केली.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in