गिरीश महाजन म्हणतात, दंगलींना राज्य सरकारचे समर्थन!

भाजपतर्फे जळगाव येथे निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
गिरीश महाजन म्हणतात, दंगलींना राज्य सरकारचे समर्थन!
BJP leader Girish Mahajan with party leaders.Sarkaranama

जळगाव : राज्यात नुकत्याच घडलेल्या दंगलींना राज्य सरकारचे समर्थन असल्याप्रमाणेच त्या ठरवून दंगली घडविण्यात आल्या काय? असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी केला. भाजपतर्फे राज्यातील दंगलीचा निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

BJP leader Girish Mahajan with party leaders.
काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रदेश अध्यक्षपदी विशाल मुत्तेमवार

त्रिपुरा येथे कथित दंगल घडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मोर्चे व आंदोलन होऊन हिंसक घटना घडल्या त्याच्या निषेधार्थ सोमवारी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

BJP leader Girish Mahajan with party leaders.
आगामी महापालिका निवडणुक भाजप विकासाच्या मुद्दयावरच लढणार!

यावेळी श्री महाजन म्हणाले, राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यास प्राधान्य दिले पाहिजे. मात्र राज्यात विविद ठिकाणी जी अशांतता निर्माण झाली, त्याला दंगली कारणीभूत आहेत. या दंगलींना जणू राज्य सरकारचे समर्थन होते की काय अशी शंका यावी असे वातावरण आहे. दंगलीनंतर देखील पोलिसांकडून दोषींवर कारवाई करण्याची गरज होती. तशी कारवाई न होता, काही ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे.

या वेळी खासदार उन्मेष पाटील, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्यासह शेकडो भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in