Thackeray- BJP Politics : ठाकरेंची फडणवीसांवरील 'ती' टीका भाजपच्या जिव्हारी : गिरीश महाजनांचेही जशास तसे प्रत्युत्तर

Girish Mahajan Politics : जळगावच्या सभेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली होती.
Thackeray- BJP Politics :
Thackeray- BJP Politics :Sarkarnama

Jalgaon Politics News : जळगावच्या सभेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली होती. या टीकेनंतर भाजप नेत्यांनीही ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच, "उद्धव ठाकरे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यंगावर बोलत असतात, परंतु त्यांच्या व्यंगावर बोलल्यास ठाकरे यांना तोंड लपवावे लागेल," अशी जळजळीत टीका राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. पाचोरा येथील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात ते बोलत होते.

Thackeray- BJP Politics :
Manoj Jarange News : मोठी बातमी! जरांगेंचे उपोषण महिनाभरासाठी मागे, पण आंदोलन सुरूच; समाजावरील बालंट टाळण्यासाठी निर्णय

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. गिरीश महाजन म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव येथे जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यंगात्मक टीका केली, त्यांना जनतेच्या माध्यमातून उद्देशून 'टरबूज' असे दोन तीन वेळा संबोधले. ठाकरेंच्या या टीकेला महाजनांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

मात्र, ठाकरे यांनीही असे वक्तव्य करताना विचार करण्याची गरज आहे. जर त्यांच्या व्यंगावर बोलले तर त्यांना तोंड लपवत फिरावे लागेल. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता काहीही राहिलेले नाही, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे. त्यामुळे ते आता काहीही बोलू लागले आहेत. त्यांनी बोलण्याचा तोल सांभाळण्याची गरज आहे.

सरकारविषयी बाेलताना महाजन म्हणाले, सरकारमध्ये आम्ही भाजप आणि शिवसेना होतो, आता अजितदादा आमच्यासोबत आले. त्यामुळे आम्ही राज्यात विकासाचे कामे करीत आहोत. जिल्ह्यातील गिरणा नदीवर बलून बंधारे उभारण्याबाबतही लवकर कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Thackeray- BJP Politics :
AAP Attack On Narendra Modi : नरेंद्र मोदी हे फक्त अदानींचे पंतप्रधान; आपची भाजपवर सडकून टीका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in