कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या गिरीश महाजनांच्या घरी लगीनघाई...

विधानसभेचे कामकाज आटोपून भेटलेल्या वेळेत गिरीश महाजन (Girish Mahajan) आपल्या जामनेर येथील निवासस्थानी मुलीच्या लग्नाची तयारी करत असल्याचे पाहायला मिळाले.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते व आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) सध्या आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नाच्या तयारीत गुंतले आहेत. महाजनांची लेक 'श्रेया'चा विवाह येत्या रविवारी (ता.20 मार्च) होत आहे. त्यासाठी महाजनांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत व विधीमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर ते बुधवारी (ता.16 मार्च) तातडीने जामनेर येथे आले. यावेळी त्यांनी लग्नाच्या तयारीची पाहणीही केली व तयारीसाठी काही सुचनाही करतांना दिसले.

Girish Mahajan
धुळे महापालिकेच्या कारभाराची चौकशी करा

राजकीय मंडळी नेहमीच राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात आणि इतर सार्वजनिक कामात आपल्याला व्यस्त दिसतात. मात्र, त्याही पलीकडे नेतेमंडळींना आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. याचाच प्रत्यय महाजनांच्या लेकीच्या लग्नाच्या निमित्ताने आला आहे. महाजन यांच्या लेकीच्या विवाह सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी राहील्याने विधानसभेचे कामकाज आटोपून भेटलेल्या वेळेत महाजनांनी आपल्या जामनेर येथील निवासस्थानी मुलीच्या लग्नाची तयारी करत असल्याचे पाहायला मिळाले. विवाह मंडपाची तयारी असेल, वरातीसाठी लागणारा घोडा असेल,अशा अनेक कामाच्या लगीनघाईत सध्या महाजन व्यस्त दिसत आहेत.

या विवाह सोहळ्यासाठी जामनेर येथे भव्य विवाह मंडप उभारण्याचे काम सुरू असून मंडपाचे प्रवेशव्दार भव्य आणि आकर्षक करण्याचे काम सुरू आहे. विधीमंडळ कामकाज सुरू असल्यामुळे महाजन मुंबईत होते. तरीही ते फोनव्दारे या तयारीवर लक्ष ठेवून होते. मात्र, होळी निमित्त दोन दिवस विधीमंडळाला सुटी असल्याने महाजन आपल्या निवासस्थानी आले आहेत.

Girish Mahajan
प्रविण दरेकरांना अटक होणार का ? ; आज सुनावणी

जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यात शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. आता गिरीश महाजन यांच्या कन्येचा विवाह सोहळा होत आहे. कोरोनाकाळात मागच्या दोन वर्षात अनेक नेत्यांच्या मुलांची विवाह सोहळे साध्या पद्धतीने पार पडली होती. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक नेत्यांच्या मुलांची विवाह सोहळे पार पडली आहे.

त्याकाळात राज्य सरकारकडून अनेक कार्यक्रमांवर बंधने असल्यामुळे अनेक नेतेमंडळींना कार्यक्रमाला बोलावनं शक्य नव्हते. आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने महाजन आपल्या मुलीचा विवाह सोहळा कश्या पद्धतीने करतात याकडे लक्ष लागले आहे. काही महीन्यांपुर्वी राज्यातील अनेक नेत्यांच्या मुलांची विवाह सोहळे शाही पद्धतीने झाली आहेत. यामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही आपल्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला होता. या विवाह सोहळ्याला देशातील अनेक नेतेमंडळींनी उपस्थिती लावली होती. तर मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाह सोहळा साध्या पद्धतीने पार पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com