Girish Mahajan: मंत्री झाल्यावर गिरीश महाजनांचे जल्लोषात स्वागत

जामनेरला समर्थकांचा व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला.
Girish Mahajan grand wel come
Girish Mahajan grand wel comeSarkarnama

जामनेर : राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री (Minister) म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मतदारसंघात आगमन झाल्यानंतर गिरीश महाजनांचे (Girish Mahajan) भारतीय जनता पक्षाचे (BJP) पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि असंख्य नागरिकांनी जागोजागी जल्लोषात स्वागत (wel come) केले. शहरात शुक्रवारी सकाळपासूनच हजारो कार्यकर्ते-पदाधिकारी, नागरिकांनी हजेरी लावल्याने अवघा जनसागर उसळल्याचे दिसून येत होते. (Followers & BJP Workers crowd wel come Girish Mahajan)

Girish Mahajan grand wel come
Raksha Khadse: केळी उत्पादकांना रेल्वे प्रशासनाने भरपाई द्यावी

पहाटे जळगावहून जामनेर मतदारसंघाकडे आगमन होत असताना रस्त्यावरील गाडेगाव, नेरीदिगर-नेरी बुद्रुक, चिंचखेडा, केकतनिंभोरा, पळासखेडा बुद्रुक येथे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी पुष्पहार-पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Girish Mahajan grand wel come
Congress Vs BJP : नाना पटोले म्हणाले, राज्यातील मंत्र्यांची मलाईदार खात्यासाठी लढाई चाललीय...

त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांचे आगमन होताच ढोल-ताशे, डिजे आदी वाद्यवृंदांच्या व फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. घोषणांनी शहर दणाणून गेले होते. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव जितू पाटील, अशोक भोईटे, मांगीलाल गिल, बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, उपसभापती दीपक चव्हाण, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे आदी मोठ्या संख्येने होते.

विशालकाय पुष्पहाराने स्वागत

राजमाता जिजाऊ चौकामध्ये कार्यकर्त्यांनी आणलेल्या विशालकाय पुष्पहाराने स्वागत करण्यात आले तसेच जेसीबीने गुलाब फुलांच्या पाकळ्या उधळण्यात आल्या. या वेळी आमदार संजय सावकारे यांचीही उपस्थिती होती. मंत्री महाजन यांचे जावई, अतुल चौधरी आणि अक्षय गुजर यांचीही हजेरी होती.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com