"संसार मोडला, पण आमचे प्रेम कायम" गिरीश महाजनांची जाहीर कबुली

काही आठवणीतील गोष्टी नेत्यांच्या तोंडून बाहेर...
Girish Mahajan, BJP
Girish Mahajan, BJPSarkarnama

जळगाव : काल शिवसेनेच्या दोन दिग्गज नेत्यांच्या घरी लगीनघाई होती. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे वधूपित्याच्या भुमिकेत तर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे वरपिता होते. शिवसेना नेते आणि उपनेत्यांच्या घरील या दोन्ही सोहळ्यांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. अनेक सर्वपक्षीय नेते एकत्र समोरासमोर आल्याने काही मनातल्या आणि काही आठवणीतील गोष्टी नेत्यांच्या तोंडून बाहेर आल्या.

जळगावमध्ये गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा मुलगा विक्रम यांच्या लग्नाला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), कृषी मंत्री दादासाहेब भुसे (Dada bhuse), अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik), पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे (Aaditi Tatkare), युवासेना सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai), भाजप आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Girish Mahajan, BJP
'भास्कर जाधव' नावाचे अस्त्र विरोधकांना पुन्हा घायाळ करणार?

यावेळी वधूवरांना आशीर्वाद देताना अनेकांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी गिरीश महाजन यांनी बोलताना आमचा २५ वर्षांचा संसार मोडला असला तरी प्रेम कायम असल्याची जाहीर कबुलीच देवून टाकली.

Girish Mahajan, BJP
संजय राऊतांसोबतच्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी सुनावलं!

महाजन म्हणाले, वरपिता गुलाबराव पाटील आमचे जुने मित्र आहेत. त्यांनी आणि आम्ही तब्बल २५ वर्षे संसार केला पण जयवंतराव तुम्ही तो मोडलात. पण आता संसार मोडला असला आमचे शिवसेनेवर आजही प्रेम कायम आहे. महाजन यांच्या या जाहीर कबुलीनंतर उपस्थित जयंत पाटील यांच्यासह सर्वच मंडळीत हास्याचे फवारे उडाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com