माझी हांजी हांजी करीत गिरीश महाजन नेते झाले!

एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजन यांचे स्व:ताचे नेतृत्व काय ?
Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish MahajanSarkarnama

मुक्ताईनगर : गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व आपली हाजी हाजी करीत नेतृत्व मिळविले. त्यांचे स्व:ताचे नेतृत्व काय?, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते, (NCP) माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.

Eknath Khadse & Girish Mahajan
मशिदीजवळ भोंगे लावाल तर ४ महिने जेल अन् तडीपारी!

श्री. खडसे म्हणाले, जामनेर मतदारसंघ शिवसेनेचा होता. मी स्व. प्रमोद महाजन यांच्याकडे आग्रह धरल्याने जामनेर मतदारसंघ भाजपचा झाला. त्यानंतर गिरीश महाजन यांना जामनेर मतदारसंघात भाजपमध्ये तिकीट मिळाले.

Eknath Khadse & Girish Mahajan
राज ठाकरे फसले; मशीदीवरील भोंगे उतरवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेशच नाही!

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर येथे भाजपच्या एका कार्यक्रमात ‘एकनाथ खडसे यांना लायकी नसताना भाजपमध्ये पदे मिळाली’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा खडसेंनी खरपूस समाचार घेतला. एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. गिरीश महाजन यांची स्मरणशक्ती कमी झाली असून, त्यांनी त्यांच्या मुलाबाळांची शपथ घालून सांगावे निधीसाठी माझे पाय धरले की नाही? आपली लायकी आपणच ओळखायची असते. दुसऱ्यांनी सांगायचे नसते.

माझ्या मागे लांगुलचालन करणारा गिरीश महाजन माझ्या आशीर्वादाने मोठा झाला. प्रत्येक वेळी आर्थिक मदतीसाठी मला पैसे द्या म्हणून मदत मागायचे. प्रत्येक वेळी गिरीश महाजन कोथळीचा सरपंच कोणाचा म्हणता, कोथळीचा सरपंच माझ्या गावचा आहे तर गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पराभव झाला म्हणून त्यांचे मन विचलित झाले आहे. मला कमजोर करण्यासाठी भाजपकडून गिरीश महाजन यांना शिरजोर नेतृत्व करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांची हाजी हाजी करून त्यांना नेतृत्व मिळते, असा टोलाही खडसे यांनी लगावला आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com