एकनाथ खडसेंच्या मुलाची आत्महत्या की हत्या?; गिरीश महाजनांचा सवाल अन् राजकारण तापलं

Eknath Khadse : मी जर हे बोललो तर हे त्यांना अजून झोंबेल.
Eknath Khadse, Girish Mahajan Latest News
Eknath Khadse, Girish Mahajan Latest Newssarkarnama

जळगाव : एकनाथ खडसे हे सध्या अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांना काय बोलावं हे कळत नाही. ते काहीही टीका माझ्यावर करत आहेत. मात्र टिकेचा विषय माझ्या पोराबाळांपर्यंत येत असेल तर त्यांना सुद्धा एक मुलगा होता. त्या मुलाचं काय झालं?, असा प्रश्न पडतो. त्यांच्या मुलाची नेमकी आत्महत्या आहे की खून झाला हे तपासायला हवे, अशा शब्दात भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या मुलाच्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यामुळे यावरून जळगावातील राजकारणं चांगलच तापलं आहे. (Eknath Khadse, Girish Mahajan Latest News)

Eknath Khadse, Girish Mahajan Latest News
निवडणूक गुजरातमध्ये, मात्र सुट्टी मिळणार महाराष्ट्रातील 'या'चार जिल्ह्यात...

गेल्या काही दिवसांपासून महाजन आणि खडसे यांच्यात चांगलाच शाब्दिक युद्ध रंगला आहे.आज जिल्हा नियोजन समिती निमित्त जिल्ह्यातील सर्व आमदार आणि पालकमंत्र्यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खडसेंच्या टीकेवर प्रत्युत्तर देत त्यांच्यावर पलटवार केला.

महाजन म्हणाले, "खडसे साहेब आजकाल काय बोलतायतं याचं भान त्यांना नाही. ते बेभान झाले असून रस्तावर उभे राहतात हातात दगड घेतात. कधी मला चावट म्हणतात.माझी बदनामी करा,असे म्हणतात. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती ढासाळण स्वाभाविक आहे. अनेक ठिकाणच्या चौकश्या, दुध संघातील त्यांचा वाद. भोसरीतील भानगडी आणि यामध्ये जे सबळ पुरावे मिळत आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. खडसे (Eknath Shinde) साहेब हे मुख्यमंत्री लेवलचे सिनिअर नेते मात्र ते काहीही बोलत आहेत, अशा शब्दात त्यांनी खडसेंवर टीकास्त्र सोडल.

Eknath Khadse, Girish Mahajan Latest News
शिंदे गटाच्या आमदाराचा भाजपला इशारा; अपमान होत असेल तर दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल

महाजन पुढे म्हणाले की, महाजनांना मुलगा नाहीत हे त्यांचं दुर्देव आहे. अन्यथा त्यांनी त्यालाही आणि सुनेलाही आमदार केलं असतं. मात्र मला दोन मुली आहेत आणि त्यांनी मी राजकारणात टाकलं नाही. मात्र, मुलगा नसणं हे काही दुर्देव्याची गोष्ट नाही. मला मुली आहेत त्यामुळे मी सुदैवी असून आनंदी आहे. पण माझा त्यांना प्रश्न आहे की त्यांनाही एक मुलगा होता. त्याच काय झालं ? याच त्यांनी उत्तर द्याव. खरतर मला हा विषय बोलायचा नाही. मात्र ते जर माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर त्यांनाही एक मुलगा होता. मग त्याच काय झालं कशामुळ झालं हाही एक संशोधनाचा विषय आहे.

Eknath Khadse, Girish Mahajan Latest News
मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर विखेंचे अतिक्रमण; बदलीचा आदेश काढला महसूल विभागाने...

मी जर हे बोललं तर हे अजून त्यांना झोंबेल. मुलाची आत्महत्या झाली की त्याचा खुन झाला हा तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका त्यातत आपलं भल आहे, अशा शब्दात महाजन यांनी खडसे यांच्या मुलाचा आत्महत्येवर प्रश्वचिन्ह उपस्थित करून खडसेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, महाजन यांनी खडसेंवर केलेल्या टिकेवर आता खडसे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र महाजन यांनी खडसेंच्या मुलाचा विषय काढून जळगावचं राजकारण चांगलचं तापवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in