`या`साठी दादा भुसेंनी मानले गिरीश महाजनांचे आभार

वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासनाने ३४८ कोटींची मंजूरी दिली.
Girish Mahajan & Dada Bhuse
Girish Mahajan & Dada BhuseSarkarnama

नाशिक : येथील (Nashik) नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, (Medical collage) ४३० खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र (Maharashtra) पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या इमारत बांधकामास ३४८ कोटी ४१ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान झाली, असे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितले. (Nashik Medical collage building fund sanction by state Government)

Girish Mahajan & Dada Bhuse
Dada Bhuse: निधी वाटपात पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप?

या निधीच्या मंजुरीसाठी जिल्हावासीयांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचे पालकमंत्री भुसे यांनी आभार व्यक्त केले.

Girish Mahajan & Dada Bhuse
Dada Bhuse: निधी वाटपात पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप?

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करणे, त्याचबरोबर अत्याधुनिक अतिविशेषोपचार आरोग्य सेवा व संशोधनास चालना देण्यासाठी महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यास शासनाने एप्रिल २०२१ मध्ये मान्यता दिलेली होती. या संस्थांच्या इमारत बांधकाम निधीस प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय मंत्री यांचेकडे पाठपुरावा केला.

वैद्यकीय महाविद्यालय व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था नाशिक शहरात सुरु झाल्यास शहरी, ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागातील जनतेस आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होतील. तसेच विविध वैद्यकीय शाखांतील विशेषज्ञांची निर्मिती होईल, अशी माहिती श्री. भुसे यांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी आरोग्य विद्यापिठालगत असलेली १४.३१ हेक्टर जागा महापालिकेकडून हस्तांतरित करावयाची आहे. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाच्या महसूल विभागाकडे सादर केलेला असून यास मंजुरी मिळेल, असे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com