शिवसेनेचे मनोज मोरे म्हणतात, `मी कचरा व्यवसायात भागीदार, त्यात गैर काय`

धुळे शहरात ऐन दिवाळीत कचऱ्याचे ढिग; महापौर म्हणतात, हे lj शिवसेनेचच कटकारस्थान..!
Shivsena leader Manoj more & Mayor Pradeep Karpe
Shivsena leader Manoj more & Mayor Pradeep KarpeSarkarnama

धुळे : ऐन दिवाळीत शहरात कचरा संकलनाचे काम बंद पडले आहे. (Garbage collection stop in Dhule city) त्यामुळे धुळेकर वेठीस धरले गेले आहेत. यामागे शिवसेनेसह ठेकेदार वॉटरग्रेस (Watergrace compony) कंपनीत भागीदार असलेले या पक्षाचे महानगरप्रमुख मनोज मोरे (Manoj More) यांचे कटकारस्थान आहे. ठेकेदार कंपनीला दोन- तीन दिवस कचरा संकलन बंद ठेवण्याबाबत सांगायचे आणि आम्ही (शिवसेना) आंदोलन करून कचरा संकलन सुरू करण्याची मागणी करू, असा संगनमताने डाव शिवसेनेने रचला आहे, असा गंभीर आरोप भाजपचे महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradeep Karpe) यांनी केला.

Shivsena leader Manoj more & Mayor Pradeep Karpe
राष्ट्रवादीचे भाजपला साकडे, निदान ओवाळणी म्हणून तरी महिलांना स्वस्त सिलिंडर द्या!

शहरात कचरा संकलन आणि रस्ते दुरूस्ती, खड्ड्यांच्या प्रश्‍नावरून भाजप आणि शिवसेनेत झुमकली आहे. यातून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेनंतर महापौर कर्पे यांनी गुरूवारी या पक्षासह मोरे यांच्यावर पत्रकाव्दारे पलटवार केला. त्याचा आशय असा

शिवसेनेचाच डाव

भाजपचे रोज नाम (व्देष) स्मरण केल्याशिवाय शिवसेनेसह मोरे यांना करमत नाही. ते कुंभाड रचून, भूलथापातून आम्ही कसे शहराचे कैवारी आणि भाजप शहर विरोधी, असे दाखविण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात आहेत. कचरा संकलनात मी भागीदार व अशा व्यवसायात गैर काय, अशी जाहीर भूमिका मोरे यांनी मांडली आहे. त्यात दिवाळीत कचरा संकलनाचे काम ते भागीदार असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने बंद केले असून शहराला वेठीस धरले आहे. विरोधकांनी संगनमत, कटकारस्थानातून कचरा संकलन बंद पाडले आहे. कंपनीने काम बंद ठेवायचे आणि नंतर आंदोलन करून पुन्हा काम सुरू करण्यास सांगायचे, असा या विरोधकांचा डाव आहे. मात्र, दिशाभूल व भूलाथापांव्दारे शहराच्या भावनेशी केला जाणारा हा खेळ धुळेकर बंद पाडतील, असा विश्‍वास आहे.

Shivsena leader Manoj more & Mayor Pradeep Karpe
कृषिमंत्री दादा भुसे म्हणतात, तरुणांनी उद्योग-व्यवसायाकडे वळावे!

विरोधकांना पोटशूळ

वॉटरग्रेस कंपनीने मनपाच्या घंटागांड्याची वाट लावली आहे. त्या नादुरूस्त केल्या आहेत. त्यासह कंपनीला जाब विचारणे सोडून आपले पाप झाकण्यासाठी मोरे भूलथापातून धुळेकरांचे लक्ष विचलीत करण्याच्या प्रयत्नात आहेत. विरोधकांकडे विकासाचा कुठलाच मुद्दा नसल्याने त्यांना भाजपच्या नावाने बोटे मोडण्याशिवाय दुसरे काम नाही. वॉटरग्रेसचे समाधानकारक काम नसल्याने सत्ताधारी भाजपने स्थायी समिती सभेतून नवीन ठेक्याची प्रक्रिया मार्गी लावली. मात्र, कुठे तरी माशी शिंकली व नवीन ठेक्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. भाजपसह माझ्यावर आकस, व्देषबुध्दीतून वाट्टेल ते आरोप करत आहेत. असे महापौर कर्पे यांनी म्हटले आहे.

मोरे यांनी पात्रता तपासावी...

महापौर कर्पे यांनी म्हटले आहे, की जनाधारामुळे मी व पत्नी पाच वेळा निवडून आलो. मात्र, मागच्या दाराने हुजरेगिरी करून नगरसेवक झालेल्यांनी प्रथम स्वतःची पात्रता तपासावी. नगरसेवक म्हणून निवडून येण्याची पात्रता गेल्या निवडणुकीत दिसून आली आहे. निवडून येण्यास कार्यकतृत्व लागते. तेव्हा पात्रता कळते. त्यामुळे त्यांनी इतरांच्या पात्रतेचा विचार करू नये, असा टोला महापौरांनी मोरे यांना उल्लेखून हाणला आहे.

..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com