सेट्रींगचे काम करणारा गणेश चव्हाण ठरला मानाच्या तलवारीचा विजेता!

महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या ११९ व्या दीक्षांत समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तलाव प्रदान केली.
सेट्रींगचे काम करणारा गणेश चव्हाण ठरला मानाच्या तलवारीचा विजेता!
Ajit Pawar with Cadet Ganesh ChavanSarkarnama

नाशिक : सोलापुरच्या (Solapur) कुर्डुवाडीचा गणेश चव्हाण (Ganesh Chavan) आईवडिलांनी मजुरी करून शिकवले. स्वतः गणेशने सेट्रींगची कामे केली अन् पोलिस झाला. महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या (MPA) प्रशिक्षणात त्यांचे घेतलेल्या अपार मेहनतीला यश आले अन् तो सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरला. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी आणि सोर्ड ऑफ रिव्हॉल्वर प्रदान करण्यात आले. तेव्हा त्याच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अभिमानाच्या भावना तरळल्या.

Ajit Pawar with Cadet Ganesh Chavan
राज ठाकरेंना इशारा... तर वारकरी गुन्हे दाखल करतील!

याबाबत ते म्हणाले, पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत पहिल्यांदा अपयश मिळाल्यानंतर अधिक जोमाने अभ्यास करत दुसऱ्याच प्रयत्नात उर्त्तीण झाल्यानंतर प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून चांगली कामगिरी करत अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बागळले होते. त्यानुसार प्रत्येक दिवस कष्ट व मेहनत घेतल्यानेच स्वप्न साकारले.

Ajit Pawar with Cadet Ganesh Chavan
`एसटी`ची गाडी आली रुळावर...प्रवासी मात्र बांधावर!

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी हे माझे गाव. याठिकाणी आई, वडील, भाऊ असे आम्ही राहतो. घरची परिस्थिती गरीबीची असताना देखील आई-वडिलांनी मोलमजुरी करून आम्ही दोघा भावांना खूप शिकविले. आपण देखील घरच्यांना काम करुन आर्थिक हातभार लावावा म्हणून मी देखील सेट्रींग काम केले. याच दरम्यान उच्च शिक्षण घेत आपण नोकरी करावी, अधिकारी व्हावे अशी इच्छा मनात होती. मात्र घराला हातभार लागला पाहिजे त्यासाठी जी शासकीय नोकरी मिळेल ती पत्करून पाया भक्कम व्हावा म्हणून २००९ मध्ये मी पुणे राज्य राखीव पोलिस दलात भरती झालो.

त्यानंतर २०११ मध्ये स्पेशल टास्क फोर्समध्ये सहभाग घेतला. याठिकाणी आठ वर्ष नोकरी केली. नोकरी करत असताना अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यासही केला. २०१६ मध्ये झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत अवघ्या एक गुणाने माझी अधिकारी होण्याची संधी गेली. मात्र हताश न होता पुन्हा जोमाने अभ्यास केला. २०१७ मध्ये खात्यांर्गत झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षते उर्तीर्ण झालो. त्यानंतर संपूर्ण प्रशिक्षण काळात उत्तकृष्ठ कामागिरी केल्याने मी आज हे यश संपादित करु शकलो. या यशामध्ये माझे आई-वडील, पत्नी आणि संपूर्ण कुटुंबाचा मोठा वाटा आहे.

-----------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.