बेडूक स्वच्छ पाण्यात विहारतो, घाण पाण्यात गांडूळ असते!

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी गिरीश महाजनांचे उपटले कान.
Kishori Pednekar & Girish Mahajan
Kishori Pednekar & Girish MahajanSarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) मुंबईतील सभेने अनेकांचे भान हरपले आहे. काही लोक तर बरळत आहेत. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही आपले ज्ञान तपासून घ्यावे. शिवसेनेवर टिका करताना, बेडूक स्वच्छ पाण्यात विहारतो हे त्यांना माहीत नसावे. घाणेरड्या पाण्यात तर गांडूळ असते, अशी टोला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे. (Ex Mayor Kishori Pednekar criticized BJP leader Girish Mahajan)

Kishori Pednekar & Girish Mahajan
शिवसेनेचे चार खासदार देखील निवडूण येणार नाही!

आज सकाळी त्यांनी सभेनंतर शिवसेनेवर टिका करणाऱ्या भाजप नेत्यांचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, महाजन यांच्याबाबत मी काय बोलू, त्यांना हे ठाऊक नाही की, घाणेरड्या पाण्यात गांडूळ राहतात. बेडूक तर स्वच्छ पाण्यात राहतो. सध्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यापुढे शिवसेनेच्या कालच्या सभेचा आरसा गेला आहे. त्यामुळे त्यांना शंभर टक्के मार्क मिळणार नाहीत. ते काही बोलत असतील तर आम्हीही तयार आहोत. त्यांना अपेक्षित असलेला ठोक के जवाब घ्यायला.

Kishori Pednekar & Girish Mahajan
शरद पवारांना धमकावणारा निघाला नाशिकचा निखिल भामरे!

त्या पुढे म्हणाल्या, बाबरी पाडल्याच्या खुपच बातम्या यायला लागल्या आहेत. बाबरी मशिद पाडली तेव्हा आम्हाला समजत होत, तेव्हा आगडोंब उसळले हे आम्हाला ठाऊक आहे. तुम्ही जर इतिहास बदलत असाल, तर तुम्हीही इतिहास व्हाल हे लक्षात ठेवा.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सातत्याच्या आरोपांचाही त्यांना समाचार घेतला. त्या म्हणाल्या, किरीट सोमय्याजी, तुम्ही काय धमक्या देताय का?. जो कायदा आहे, जे सत्य आहे ते येईल समोर. स्त्री- पुरुष काही बघायचं नाही आणि बोलत सुयाटचे. तोंड बंद करा ही धमकी आहे. त्यावर पण मी विचार करेन. दर वेळी धमकी देता. तुमचे जे चाळे चाललेत ते जनतेला कळतात. तुम्ही धमक्या कोणाला देता?. खोटं दाखवायचे ते दाखवा, पण महिलेला धमक्या देताय. जे असेल त्याला सामोरं जायला मी तयार आहे.

त्या म्हणाल्या, तेजस ठाकरेंचा काही एक संबंध नसताना त्यांना या राजकारणात ओढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तेजस ठाकरेंनी खेकडे, मासे आणलेत, त्यावरही हे तेच बोलतील. रावसाहेब दानवे यांना म्हणावं, तुम्ही बाबरीवर कुठे होतात, तीथे बघा.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्याबाबत त्या म्हणाल्या, ते लोकांना कनफ्यूज करत आहेत, त्यातून लोकांचं मात्र मनोरंजन होते आहे. यावेळी त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्या नवी दिल्लीतील हनुमना चालीसा कार्यक्रमाबाबत विचारले असता, त्यांनी `तीन पैशांचा टिंब टिंब टिंब, त्यांना करू देत` या एका वाक्यात उत्तर देत राणा प्रकरणावर बोलणे टाळले.

केतकी चितळे मनोरूग्ण

शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या केतकी चितळे विषयावर त्या म्हणाल्या, मला त्या मुलीबद्दल काही बोलायचं नाही. ती मनोरुग्ण आहे, त्याचे ती धडे देते आहे. तीला झटके येतात. त्या झटक्यातच काही झालं असेल.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com