एकीकडे मोफत लस अन् दुसरीकडे महागाईत लोटायचे, हा कसला कारभार?

प्रचंड महागाईच्या आगीत जनता होरपळते आहे. इंधनाच्या किमती आकाशाला भिडल्या आहे.
एकीकडे मोफत लस अन् दुसरीकडे महागाईत लोटायचे, हा कसला कारभार?
Dhananjay Munde, NCPSarkarnama

साक्री : प्रचंड महागाईच्या आगीत जनता होरपळते आहे. (People are hoarse in huge inflation) इंधनाच्या किमती आकाशाला भिडल्या आहे. (Fuel prices are reached at highest lavel) त्या नियंत्रणात आनण्यात केंद्र सरकार पूर्णतः अयशस्वी झाले आहे. (Centre fail to work) त्यामुळे हे अपयश लपविण्यासाठी ते मोफत लस दिल्याचा प्रचार करीत आहेत. सध्याच्या सरकारचा कारभार म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळ झाला आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी केले.

Dhananjay Munde, NCP
समृद्धी महामार्ग, शिर्डीनजीक २६ एकर जमीन पुनूमियाची की परमबीर सिंग यांची?

साक्री बाजार समिती आवारात मंगळवारी धनगर, ठेलारी समाजाचा मेळावा झाला. यावेळी ते बलत होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले. या वेळी ते म्हणाले, की सात वर्षांपासून देशात व मागच्या पाच वर्षांत राज्यात जो सत्तेत होता तो भारतीय जनता पक्ष शेतकरी, शेतकऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक जातीला समूळ नष्ट करण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या या वृत्तीला कायमच दूर करण्याची वेळ आली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या सांगण्यानुसार लशीचा जो काही खर्च येतोय यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. म्हणजे या किमती वाढवून लशीचा खर्च वसूल केला जातोय. एकीकडे मोफत लस दिली, अशी जाहिरातबाजी होतेय पण १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीत पेट्रोल-डिझेल भरणाऱ्यांना ती कितीला पडतेय याचादेखील हिशेब करावा. मोफत लशी दिल्याचा भास निर्माण केला जात असला तरी तो किती फसवा आहे हेच यातून सिद्ध होत असल्याचे टीकास्त्र मंत्री धनंजय मुंडे यांनी या वेळी सोडले.

...

Related Stories

No stories found.