नाशिकला आक्रमक शिवसेनेची चक्क गांधीगिरी

महापालिका विरोधातील मोर्चात शिवसेना नेत्यांची दिसली एकजुट
Shivsena agitation at NMC gate
Shivsena agitation at NMC gateSarkarnama

नाशिक : जेलरोड (Nashik) परिसरातील नागरी समस्यांबाबत शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) शुक्रवारी महापालिकेच्या (NMC) नाशिक रोड विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून ठिय्या आंदोलन (Agitation of Shivsena) करण्यात आले. त्यात शहरातील सर्व मोठे नेते सहभागी झाल्याने महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आपले शक्तीप्रदर्शन केल्याचे चित्र होते. (Shivsena`s straingth demonstration in Nashik road for civic issues)

Shivsena agitation at NMC gate
शिवसेनेचा आरोप, महापालिका अभियंत्याने घेतले अडीच लाख!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या सहकारी संघटनांना डिवचण्यासाठी सावरकरांशी संबंधीत विधान केले. या विधानाने भाजप परिवारातील संघटना संतापल्याच मात्र शिवसेना नेते संजय राऊत देखील नाराज झाले. त्यातूनच महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा संदेश पसरला. हे सर्व होत असतानांच शिवसेनेने मात्र नाशिकमध्ये गांधीगिरी केल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

Shivsena agitation at NMC gate
१४९ च्या नोटीसीला पळून जाणारे लोक...: अंधारेंनी मनसेच्या जखमेवर मीठ चोळलं

शहरातील जेल रोड परिसरातील समस्यांबाबत मागण्याचे निवेदन विभागीय अधिकारी सुनील आव्हाड यांना देण्यात आले. यावेळी त्यांना महात्मा गांधी यांची प्रतिमा भेट देवून गांधीगिरी मार्गाने तरी समस्या सोडवा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेची ही गांधीगिरी चर्चेचा विषय ठरली.

मोर्चाला जेल रोड येथून सुरवात होऊन बिटको चौक, मुक्तिधाम, एमजी रोड मार्गे विभागीय कार्यालयावर नेण्यात आला. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की साईनाथनगर, कॅनॉल रोड पूर्व, जेल रोड येथे भूमिगत गटारी, रस्ता, पथदीप, जलवाहिनी, घंटागाडी, अस्वच्छता आदी नागरी समस्यांमुळे त्रस्त आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडे, ऑनलाइन माध्यमातून लेखी, तोंडी, फोनद्वारे वारंवार तक्रार करूनदेखील महापालिकेकडून कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही. या समस्यांबाबत जोपर्यंत कामास प्रत्यक्षात सुरवात होत नाही, तोपर्यंत १ डिसेंबरपासून आमरण उपोषण करू. तसेच, कामासंदर्भात जे अधिकारी संबंधित असतील तेच सर्वस्वी जबाबदार राहतील, अशा इशारा निवेदनात दिला आहे. याबाबात सुनील आव्हाड यांनी येत्या १० ते १५ दिवसात शक्य होतील त्या कामांना सुरवात करण्यात येईल.

लवकरात लवकर इतर समस्या सोडविल्या जातील, असे आश्‍वासन दिले. या वेळी शिवसेना उपनेते बबन घोलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, आयोजक रोहित गाडे, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, ॲड. सुनील बोराडे, राहुल ताजनपुरे, किरण गायकवाड, नितीन चिडे, राजेंद्र ताजणे, राजेंद्र मोरे, मसूद जिलानी, कुमार गायकवाड, शिवा तकाटे, योगेश नागरे, विकास गिते, योगेश देशमुख, विक्रम थोरात, रमेश पाळदे, कुमार पगारे, सागर भोजने, सागर निकाळजे, शिवा गाडे, नगमा अन्सारी, सतीश वडनेरे, मनोज वडनेरे, लताबाई वडनेरे, कुरसेद अन्सारी, दत्ताराव काळे, कैलास दाभाडे, राम सकट, राजू पिंजारी, मुबारक सय्यद, गंगाधर खंदारे, संजय वाघ, सुदाम मोरे, शंकर शिरसाट, विजय राठोड, नजीर खान, केवल पवार, दत्ता दाभाडे, श्री. अन्सारी, सिध्दार्थ भवार आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in