Manikrao Gavit : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

manikrao gavit passed away : नंदुरबारमध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला होता.
Manikrao Gavit
Manikrao GavitSARKARNAMA

नंदुरबार :नंदुरबार जिल्ह्यातून सलग नऊ वेळा काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आलेले, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित (वय ८७) यांचे आज (शनिवारी) सकाळी निधन झाले. (former union minister of state manikrao gavit passed away)

गेल्या काही दिवसांपासून गावित यांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे त्यांना नाशिकच्या सुयश खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान त्यांचे निधन आहे. नंदुरबारमध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला होता. गावित यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले होते.

Manikrao Gavit
Bachchu Kadu : मी मंत्री बनणारच, तो माझा अधिकार ; नाराज आमदार बच्चू कडू यांचं मोठं विधान

इंदिरा गांधी या प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची सुरुवात नंदुरबारमधून करत होत्या. सोनिया गांधी यांनीही त्यांची पहिली जाहीर सभा नंदुरबारमध्येच झाली होती. याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व गावित यांनी केले होते.

गावित यांचा राजकीय प्रवास

  1. माणिकराव गावित यांनी 1965 मध्ये आपल्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला होता. ते ग्रामपंचायतीतून निवडून आले होते.

  2. गावितांना केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री ही पदे भूषविली होती.

  3. 1981 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयीही झाले.

  4. त्यांनी 2014 पर्यंत पराभव पाहिला नव्हता.

  5. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in