Chhatrapati Sambhajiraje : कर्नाटक सरकारकडून खबरदारी; छत्रपती संभाजीराजेंना दिली वाय प्लस सुरक्षा

Chhatrapati Sambhajiraje : कर्नाटक सरकारकडून विशेष खबरदारी, तो पर्यंत असेल सुरक्षा...
Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati Sambhajiraje Sarkarnama

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावादाचा मुद्दा तापलेला आहे. तर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) हे आज बेळगाव दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी संभाजीराजे छत्रपती यांना कर्नाटक (Karnataka) सरकारने वाय प्लस सुरक्षा दिली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी कर्नाटक राज्याच्या हद्दीत प्रवेश केल्यापासून ते कर्नाटक राज्याच्या हद्दीतून बाहेर जाईपर्यंत त्यांना कर्नाटक सरकारच्यावतीने वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संभाजीराजे छत्रपती यांना कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी कर्नाटक सरकारने घेतली आहे.

Chhatrapati Sambhajiraje
Sanjay Raut : फडणवीसांकडून 'नॅनो मोर्चा' म्हणून खिल्ली, राऊत म्हणाले,''दिल्लीश्वरांनी दिलेलं...''

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांना याबाबत कर्नाटक पोलिसांकडून (Karnataka Police) फोन आला होता. वाय प्लस सुरक्षा देणार असल्याचे यावेळी संभाजीराजे यांना कर्नाटक पोलिसांकडून सांगण्यात आले. मध्यंतरी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्याच्या सीमाभागात आंदोलन होऊन काही गाड्या फोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन्ही राज्याच्या सीमाभागात मोठा तणाव निर्माण झाला होता.

Chhatrapati Sambhajiraje
Jitendra Awhad : ते मुख्यमंत्री आहेत की व्हाइसरॉय? जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांवर संतापले

यानंतर सीमाभागात मोठा पोलीस (Police) बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चर्चा करण्यात आली होती.

तर आज संभाजीराजे छत्रपती हे एका कार्यक्रमासाठी बेळगाव (Belgaum) दौऱ्यावर आहेत. यावेळी कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी कर्नाटक सरकारकडून खबरदारी घेण्यात आली असून संभाजीराजे यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com