मला आता काहीच मिळवायचे नाही; तरुण नेतृत्वाच्या हाती सूत्रे देणार!

माजी मंत्री मधुकर पिचड यांची विरोधकांवर टीका
मला आता काहीच मिळवायचे नाही; तरुण नेतृत्वाच्या हाती सूत्रे देणार!
Madhukar pichadSarkarnama

अकोले (जि. नगर) : अकोले तालुक्यात निर्मितीचे, विकासाचे काम करण्याचे भाग्य मला मिळाले. सिंचन, रस्ते, वीज अशी असंख्य कामे आपल्या हातून मार्गी लागली आहेत. मात्र, गेल्या चाळीस वर्षांत काय केले हे म्हणणे आंधळ्यांच्या गावात आरसे विकण्यासारखे आहे. रस्त्याने कुत्रे कितीही भुकले तरी हत्ती आपले चालणे सोडत नाही, असे उद्‌गार माजी मंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांनी अकोले येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात बोलताना काढले. (Former Minister Madhukar Pichad criticizes the opposition)

यावेळी माजी आमदार वैभव पिचड, रमेश धुमाळ, वसंत मनकर, बाळासाहेब वैद्य, कैलास वाकचौरे, शिवाजी धुमाळ, सीताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे, उमेदवार शरद नवले, हितेश कुंभार, सुधाकर देशमुख, सोनाली नाईकवाडी, कल्पना सूरपुरिया, राहुल देशमुख, शंकर नेहे उपस्थित होते.

Madhukar pichad
भाजपला जोरदार धक्का : अनेक शिलेदारांचा गडाखांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश

माजी मंत्री पिचड म्हणाले की, अकोले ग्रामपंचायत होती, तिचे रूपांतर नगरपंचायतमध्ये केले. स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला. निळवंडे जलाशय म्हालादेवी मंदीर रद्द करून उभारणीचे काम केले. आदर्श पुनर्वसन केले. ३२ गावं पाणी योजनेस मंजुरी आणून काम सुरू केले. तालुक्यातील छोटी मोठी बंधारे, अकोलेपर्यंत असलेला डांबरी रस्ता, वीज आज खेड्यापाड्यात अगदी वाडी वस्तीत नेली, हे निर्मितीचे काम आपण केले आहे.

Madhukar pichad
फटेकडून फसवणुकीची सुरुवात बारावीपासूनच... आई म्हणून 'मेस'मधील महिलेला केले उभे!

विधानसभेत अर्थ संकल्पावर भाषण करून अकोल्याचे नाव राज्यात नेले. आदिवासींसाठी स्वतंत्र आर्थिक बजेट केले. आश्रमशाळांच्या निर्मितीचे काम केले, जे माझ्यासोबत होते, ते म्हणाले विकास नाही म्हणून आम्ही बाजूला गेलो. बरे झाले देवाने माझ्याभोवती असलेले जळमाटे दूर गेली, यापुढे नवीन तरुणांना संधी देऊन त्यांच्या हाती तालुक्याचे सुत्र देऊ. मला काहीच मिळवायचे नाही. मला सर्व काही मिळाले. मात्र जीवात जीव असेपर्यंत तालुका चुकीच्या माणसांकडे जाऊ देणार नाही. ज्यांना विकास काय, अर्थसंकल्प माहीत नाही. आदिवासी योजनाचा निधी योग्यपद्धतीने वापरता येत नाही, त्यांच्याबद्दल टीका करण्याएवढे ते मोठे नाहीत, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.

Madhukar pichad
बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी शरद पवार येणार होते; पण...

गेल्या दोन वर्षांत ३२ गावची पाणी योजना चालू करणे आवश्यक होते. उपजिल्हा आरोग्य केंद्र होणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. संगमनेर तालुक्यात निळवंड्याचे पाणी गेले, त्यातून आपल्याला पाणी मिळते. मात्र आंदोलन करण्याची वेळ आपल्याच लोकप्रतिनिधीवर येते. याला विकास म्हणायचे काय. या नगरपंचायत निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष सत्तेवर येणार ही काळया दगडावरील पांढरी रेघ आहे. अकोले शहरातील मतदार सुज्ञ आहेत, ते चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता देणार नाहीत, असा विश्वासही पिचड यांनी या वेळी बोलून दाखवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.