तुम्ही सव्वाशेर नाही, पावशेर आहात..म्हणे मोठा नेता ; खडसेंची उडवली खिल्ली

''आता तुमचा दबदबा राहिलेला नाही. तुम्ही सव्वाशेर नाही, आता पावशेर झाले आहात,'' असे म्हणत महाजन यांनी खडसेंची खिल्ली उडवली
तुम्ही सव्वाशेर नाही, पावशेर आहात..म्हणे मोठा नेता ; खडसेंची उडवली खिल्ली

Eknath Khadse,Girish Mahajan

sarkarnama

बोदवड (जळगाव) : बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २१) मतदान होत आहे. प्रचाराचा शेवटच्या दिवशी भाजपतर्फे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या दहा उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली होती. भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) व या सभेच्या काही अंतरावरच राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांची प्रचार सभा होती. खडसे-गिरीश महाजन आमनेसामने आल्याने राजकीय वातावरण तापलं होतं.

गिरीश महाजन यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी सरकार, एकनाथ खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. बोदवड शहरात अनेक वर्षांपासून पाणीटंचाई आहे. या विषयांवरुन महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. ''मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता,'' असे म्हणत महाजन यांनी खडसेंची खिल्ली उडवली.

खडसे यांनी महाजन यांच्यावर शेरोशायरीच्या माध्यमातून खडसेंनी काही दिवसापूर्वी टीका केली होती. त्याला महाजन यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं. महाजन म्हणाले, ''आता तुमचा दबदबा राहिलेला नाही. तुम्ही सव्वाशेर नाही, आता पावशेर झाले आहात,''

''तुमच्या चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला धडा शिकवला आहे. आता कितीही आवाज चढवला, तुमची धार बोथट झाली आहे. आता तुमचं खरं नाही. दुकानदारी बंद करा, एकनाथ खडसेंनी मला मोठे केले नाही तर मी जनतेचे प्रश्न सोडवून विकासकामांमुळे मोठा झालो,'' असे महाजन यांनी म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Eknath Khadse,Girish Mahajan</p></div>
पठ्ठ्या कुठंय? दानवेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख

''महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. राज्यात व जळगाव जिल्ह्यात शेतकर्‍यांना काय नुकसान भरपाई मिळाली. मोठ्यांची नावं रेशनकार्डावर आणि गरजू रेशनकार्डपासून वंचित आहेत. बोदवड शहरामध्ये पिण्यासाठी पाणी मिळत नाही, महिलांचे हाल होत असताना मात्र राज्य सरकारने दारु स्वस्त केली, आता लोकांनी दारु प्यायची का?'' असा सवाल महाजन यांनी यावेळी उपस्थित केला.

''ठाकरे सरकारच्या काळात गेल्या दोन वर्षांत एकही भरती झालेली नाही. अन् जी भरती झाली त्यातही भ्रष्टाचार केला. म्हाडा असो की आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया एकही परीक्षा पारदर्शक झाली नाही,'' असा आरोप गिरीश महाजन यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in