Uddhav Thackeray and Sushma andhare
Uddhav Thackeray and Sushma andhareSarkarnama

Uddhav Thackeray : सुषमा अंधारेंच्या भाषणाची ठाकरेंना भूरळ; त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले...

Uddhav Thackeray In Jalgaon: केंद्रीय निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.

Jalgaon News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जळगावमध्ये आज (दि.२३ एप्रिल) जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगावरही जोरदार टीका केली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्या भाषणाच्या स्टाईलमध्ये सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केला. ठाकरे यांनी अंधारे यांच्या स्टाईलचा भाषणात उल्लेख केल्याने खुद्द ठाकरेंना देखील अंधारे यांच्या भाषणाची भूरळ पडल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

Uddhav Thackeray and Sushma andhare
Thackeray on Gulabrao Patil : ठाकरेंचा गुलाबराव पाटलांना इशारा; म्हणाले, सभेत घुसणार म्हणणाऱ्या घुशींना...

भाषणावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ''या सभेला जमलेली गर्दी पाहिल्यानंतर हे कळतं की शिवसेना कुणाची आहे. पाकिस्तान सुद्धा सांगेल की शिवसेना कुणाची आहे. पण आपल्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्तांना हे कळत नाही. मात्र, तो त्यांचा दोष आहे. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी अजून ओळखलं नसेल'', असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर प्रहार केला.

Uddhav Thackeray and Sushma andhare
Uddhav Thackeray : बघू महाराष्ट्र कुणाच्या पाठिशी उभा राहतो...ठाकरेंचे शिंदे-भाजपला आव्हान

ते पुढे म्हणाले, ''आता सुषमा ताईंच्या (सुषमा अंधारे यांच्या) स्टाईलमध्ये सांगायच झालं तर ही घोषणा मी दिलेली नाही. हे पत्रकार बंधूनी आणि पोलिसांनी याची नोदं घ्यावी. काय घोषणा दिली तुम्ही? मी अजिबात बोललेलो नाही. बोलोय का?'', असं उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्या भाषणाच्या स्टाईलमध्ये म्हटलं. त्यामुळे खुद्द ठाकरेंना देखील सुषमा अंधारेंच्या भाषणाची भूरळ पडल्याचे पाहायला मिळाले.

(Ediited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com