कार्यालयांमध्ये महिलांसाठी विशाखा समिती स्थापन करा!

महिला आयोगाच्या सदस्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्या तळोदा दौऱ्यात विभागांना सूचना
Ex MLA Deepika Chavan & Utkarsha Rupwate
Ex MLA Deepika Chavan & Utkarsha RupwateSarkarnama

तळोदा : पंधरापेक्षा अधिक महिला (Womens) कर्मचाऱ्यांची किमान १५ संख्या असणाऱ्या आस्थापनांमध्ये विशाखा समिती (Vishakha committee for womens) स्थापन करावी. याबाबत अजिबात हलगर्जी करू नये. याकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण (Deepika Chavan) व उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांनी दिले. (Admiinstration shall treat womens safty on priority)

Ex MLA Deepika Chavan & Utkarsha Rupwate
उद्धव ठाकरेंना बंडखोर आमदाराच्या भगिनीची निष्ठेची मोठी भेट!

राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण व उत्कर्षा रुपवते यांनी तळोदा, अक्कलकुवा दौऱ्यात विविध विभागांच्या महिलांसाठी असणाऱ्या योजनांचा आढावा घेत मुख्यतः बालविवाह बाबत व समुपदेशन केंद्राच्या वेळोवेळी आढावा घेण्याबाबतच्या सूचना संबंधितांना केल्या.

Ex MLA Deepika Chavan & Utkarsha Rupwate
Udayanraje Bhosale : उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना जोरदार प्रत्युत्तर , म्हणाले..

माजी आमदार दीपिका चव्हाण व उत्कर्षा रुपवते यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा नगरपालिकेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.

अक्कलकुवा येथील तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती येथील महिला समुपदेशन केंद्र व शासकीय आदिवासी आश्रम शाळा तालांबा येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण व उत्कर्षा रुपवते यांनी भेट देऊन अक्कलकुवा तहसील कार्यालय येथे विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. यावेळी अक्कलकुवा तहसीलदार सचिन मस्के, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बिरारे, प्रभारी पोलिस निरीक्षक राजेश गावित, प्रभारी ग्राम विकास अधिकारी महेश पोतदार, तालुका वैद्यकीय अधिकारी तृप्ती पटले, तालुका महिला व बाल विकास अधिकारी अभिजित मोलाणे आदी उपस्थित होते.

अक्कलकुवा बैठकीत आरोग्य, बचतगट महिलांना विविध योजना विषयी माहिती, अंधश्रद्धा,महिला सशक्तीकरण या मुख्य विषयांवर काम करण्याची आवश्यकता दिसत आहे. तसेच तालुक्यात एकच समुपदेशन केंद्र असल्याने त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी नमूद केले.

यावेळी दीपिका चव्हाण व उत्कर्षा रुपवते यांनी तळोदा उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली, त्यांनी तेथील विविध कक्षांना भेट देत एकंदरीत परिस्थिती जाणून घेतली. व आवश्यक त्या सूचना केल्या. नगरपालिकेत सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. लोभाणी आश्रमशाळेला भेट देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांचा अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी प्रकल्पाधिकारी डॉ. मैनाक घोष, तहसीलदार गिरीश वखारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, मुख्याधिकारी सपना वसावा, प्रभारी पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल, पोलिस उपनिरीक्षक ज्योती पावरा, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी, सभापती यशवंत ठाकरे, सहाय्यक प्रकल्पाधिकारी श्री. साबळे, महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी, दामिनी पथकाच्या सौ. देवरे, मिशन वात्सल्य समितीच्या निलाबेन मेहता, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी आदी उपस्थित होते.

...

प्रशासन महिलांविषयक नियमांची उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध आहे. महिलांनी अडचण असल्यास समुपदेशन केंद्राला भेट द्यावी. तालुका प्रशासन महिला सशक्तीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.

- सचिन मस्के, तहसीलदार अक्कलकुवा तालुका

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in