Congress; पाच हजार नाशिककरांची राहुल गांधींना साथ

भारत यात्रेत जिल्हाभरातील पदाधिकारी होणार सहभागी, शेगावच्या सभेसाठी नियोजन
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

नाशिक : कॉँग्रेसचे (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाली असून, ३८४ किलोमीटरच्या राज्यातील प्रवासात शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून यात्रेत नाशिक शहर व जिल्ह्यातील (Nashik) पाच हजार पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. उद्या (ता.१८) शेगाव येथील सभेसाठी शहरासह जिल्हाभरातून कार्यकर्ते आज रवाना होणार आहेत. (five thousand Congress workers will proceed for Bharat jodo yatra in shegaon)

Rahul Gandhi
काँग्रेसने केले राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे वस्त्रहरण!

भारत जोडो यात्रेमध्ये नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. याशिवाय प्रत्येक फ्रंटलचे पदाधिकारी, काही सामाजिक संस्था प्रतिनिधी यांचे नियोजन करण्यात आले आहेत. सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेवादलाच्या गणवेशांमध्ये या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. गुरुवारी शहरातील बस, खासगी वाहने रवाना होणार आहेत, असे काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांनी सांगितले.

Rahul Gandhi
दादा भुसे हे विकासकामांत भेदभाव करणारे मंत्री!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली ‘भारत जोडो यात्रा’ ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल झाली. यात्रा महाराष्ट्रात एकूण १८ दिवस चालणार आहे. ७ ते २० नोव्हेंबरदरम्यान पाच जिल्ह्यांमधून ही पदत्राया मार्गक्रमण करणार आहे. राहुल गांधी यांनी १० नोव्हेंबरला नांदेडमध्ये सभा घेतली. दुसरी जाहीर सभा १८ नोव्हेंबरला शेगावमध्ये होणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होण्याबाबतचे नियोजन प्रदेश काँग्रेसने केले आहे.

या यात्रेत भारत यात्री, राज्य यात्री व जिल्हा यात्री असे तीन प्रकार करण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला जबाबदारी देण्यात आली असून, त्यांना तारीख देखील निश्चित करून दिली आहे. यात नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस १९ नोव्हेंबरपासून खामगाव (जि. बुलढाणा) येथून निघाणाऱ्या पत्रयात्रेत सहभागी होणार आहेत. त्याकरिता शहर काँग्रेस व जिल्हा काँग्रेसतर्फे नियोजन करण्यात आले आहे.

चांदवडचे ५०० कार्यकर्ते जाणार

चांदवड तालुका काँग्रेस कमिटीची बैठक माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली येथे झाली. १८ नोव्हेंबरला शेगाव येथे होणाऱ्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये चांदवड तालुक्यातून ५०० कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती या वेळी कार्याध्यक्ष समाधान जामदार, अॅड. अन्वर पठाण, अक्षय माकुने, दत्तूमामा ठाकरे, नंदू कोतवाल, भाऊसाहेब शेलार यांनी दिली.

भारत यात्रेत सहभागासाठी जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. साधारण पाच हजारांहून अधिक नाशिककर या यात्रेत सहभागी होतील, असे नियोजन आहे. सभेसाठी नाशिककर रवाना झाले आहेत.

-डॉ. तुषार शेवाळे (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in