नव्या सरकारमध्ये असणार खानदेशचे ५ मंत्री

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गिरीश महाजन, अमरीशभाई पटेल यांसह खानदेशच्या पाच जणांची वर्णी शक्य आहे.
Dada Bhuse, Amrishbhai Patel, Jaykumar Rawal & Girish Mahajan
Dada Bhuse, Amrishbhai Patel, Jaykumar Rawal & Girish MahajanSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : राज्यातील (Mahavikas Aghadi) ठाकरे सरकार कोसळल्यानंतर नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे स्पष्ट आहे. या नव्या सरकारमध्ये बंडखोरांसह भाजपमधील (BJP) काही आमदारांचीही वर्णी मंत्रिपदासाठी लागेल, हे निश्चित आहे. तब्बल पाच मंत्रिपदे खानदेशच्या वाट्याला नव्या सरकारमध्ये येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (North Maharashtra`s five minister in new Government)

Dada Bhuse, Amrishbhai Patel, Jaykumar Rawal & Girish Mahajan
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याला संजय राऊतच जबाबदार

शिवसेनेत उभी फूट पडल्याने त्याचा परिणाम आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पालिकांच्या निवडणुकांवरदेखील होणार आहे. तत्पूर्वी, शिवसेनेच्या बंडखोर गटामधील कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता तब्बल सहा आमदार शिंदे गटासोबत सामील झालेले आहेत, त्यामुळे मंत्रिपदासाठीची रस्सीखेच पुढच्या काळात पाहायला मिळेल.

Dada Bhuse, Amrishbhai Patel, Jaykumar Rawal & Girish Mahajan
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा; अडीच वर्षांनंतर 'मविआ' सरकार पायउतार

खानदेशात देवेंद्र फडणवीस यांचे दोन विश्वासू मंत्री फडणवीस सरकारमध्ये होते. त्यात गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांचा समावेश होता. हे पुन्हा मंत्री होतील. फडणवीस यांचे डावे-उजवे म्हणून या दोन्ही मंत्र्यांनी त्यांना गेल्या सरकारात साथ दिली होती. या दोन्ही मंत्र्यांसह शिरपूरचे भाजप आमदार अमरिशभाई पटेल हेदेखील नव्या सरकारमध्ये मंत्री होतील. या तिन्ही आमदारांना कॅबिनेट दर्जाची मंत्री पदे बहाल केली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. अमरिशभाई आघाडी सरकारमध्येही कॅबिनेट मंत्री होते, तो अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

बंडखोर आमदारांपैकी महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले गुलाबराव पाटील पुन्हा कॅबिनेट मंत्री होतील. पाचोऱ्याचे बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्याकडे राज्यमंत्री दर्जाचे खाते सोपविले जाण्याची शक्यता आहे. पारोळ्याचे बंडखोर आमदार चिमणराव पाटील, चोपड्याच्या बंडखोर आमदार लताताई सोनवणे आणि मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाट्याला मंत्रिपदाची शक्यता धूसर आहे.

मालेगाव बाह्यचे शिवसेना बंडखोर आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमधील कृषिमंत्री दादा भुसे कॅबिनेट दर्जाचे मंत्री नव्या सरकारमध्येही असतील. दादा भुसे सुरवातीपासून एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात, तर नांदगाव-मनमाड विधानसभेचे शिवसेना बंडखोर आमदार सुहास कांदे यांना राज्यमंत्रिपदाचे खाते मिळण्याची दाट शक्यता आहे. सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्ध दंड थोपटल्यानंतर ते राज्यभर चर्चेत आले होते. त्यामुळे शिवसेना बंडखोरांपैकी या दोघांची वर्णी मंत्रिमंडळात लागणे जवळपास निश्चित आहे. ज्या वेगवान घडामोडी राजकीय पटलावर होत आहेत, त्याहून वेगवान घडामोडी आता पुढच्या काही दिवसांमध्ये भाजपच्या अंतर्गत आणि त्यांना साथ देणाऱ्या आमदारांच्या गटात पाहायला मिळणार आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in