महिलांचा अपमान करायचा आणि माफी मागायची, हे समर्थनीय नाही!

रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत महिलांचा मेळावा
Rupali Chakankar
Rupali ChakankarSarkarnama

धुळे : राज्य शासनाने (Mahavikas Aghadi Government) निकषानुसार मॉल, सुपर मार्केटमध्ये वाइन (Wine) विक्रीचा निर्णय जाहीर केला. याविषयी राज्यातील एकाही महिलेकडून राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे महिलावर्गाने हा निर्णय सकारात्मकतेने घेतला, अशी भूमिका आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी येथे मांडली. अशात धुळे शहरातून राज्य दारूबंदी महिला मोर्चातर्फे पहिली तक्रार दाखल झाली. तिचे सौ. चाकणकर यांनी स्वागत केले.

Rupali Chakankar
शक्ती कायद्यामुळे महिलांवरील अत्याचारांना चाप बसेल

‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जनसुनावणी झाली. नंतर आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. राज्य सरकारच्या वाइन विक्रीच्या निर्णयाबाबत त्या म्हणाल्या, की तीन पक्षांचे सरकार राज्यात आहे. शेतकरीहित, दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनाच्या संकटामुळे राज्यात निर्माण झालेली आर्थिक तूट पाहता सरकारने हा निर्णय घेतला. याबाबत राज्यातून एकाही महिलेची आयोगाकडे तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे महिलावर्गाने हा निर्णय सकारात्मकतेने घेतल्याचे दिसते. अशात राज्य दारूबंदी मोर्चाच्या येथील संस्थापक गीतांजली कोळी यांनी वाइन विक्रीच्या निर्णयाविरोधात येथे पहिली तक्रार दाखल झाल्याने या भूमिकेचे सौ. चाकणकर यांनी स्वागत केले.

Rupali Chakankar
दानवेंच्या प्रयत्नांना यश; जालना-जळगांव रेल्वे मार्गाच्या सर्वेला मंजुरी

आता गुन्हा दाखल करू

काही राजकीय व्यक्ती महिलांबद्दल अपशब्द वापरतात किंवा आक्षेपार्ह विधान करतात. त्यावर केवळ माफी मागा, अशी मागणी केली जाते. ही भूमिका योग्य की अयोग्य, अशा प्रश्‍नावर सौ. चाकणकर म्हणाल्या, की या घटनांमध्ये राज्य महिला आयोग सुमोटो दखल घेत कारवाईची मागणी करते. आरोपीने गुन्हा करायचा आणि माफी मागायची, हे समर्थनीय नाही. यापुढे संबंधित राजकीय व्यक्तीने राजकीय वा इतर व्यासपीठावर महिलेविषयी आक्षेपार्ह विधान केले, तर नोटीस बजावण्यासह गुन्हा दाखल केला जाईल.

भाजप सरकारवर टीका

कर्नाटकातील हिजाब प्रकरणी हिंदू- मुस्लिम वाद निर्माण करण्याचाही प्रयत्न होत असल्याबद्दल छेडले असता सौ. चाकणकर म्हणाल्या, की महाराष्ट्र साधू-संतांची भूमी आहे. एकोपा राखून राज्यात शांतता नांदत असते. मात्र, हिंदू- मुस्लिम वाद निर्माण करतो कोण? यात एक घटक सातत्याने राज्य अस्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तो घटक कोण (भाजपचा नामोल्लेख टाळून) हे सर्वजण पाहात आहेत. विरोधकांची केंद्रात सत्ता आहे. त्यांनी राज्यात वाद निर्माण करू नये. तसेच, संकटात महाराष्ट्र एकीच्या बळावर उभा राहतो आणि नेहमी वाद निर्माण करणाऱ्यांना चपराक देत असतो याची जाणीव त्यांनी ठेवावी. मुंबईत ट्रॅफीकमुळे घटस्फोट होतात, असे विधान करणाऱ्यांनी कसा हा शोध लावला, ते त्यांनाच विचारा, असे सौ. चाकणकर यांनी स्पष्ट केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com