PI Bakale: निलंबनानंतर निरीक्षक बकालेंवर गुन्हा दाखल

ऑडिओ क्लिप व्हायरल करणारा जळगाव पोलिस मुख्यालयातील हजेरी मास्तर महाजन निलंबित
PI Kirankumar Bakale
PI Kirankumar Bakale Sarkarnama

जळगाव : गुन्हेशाखेचे (Crime Branch) निरीक्षक किरणकुमार बकाले (Kirankumar Bakale) याच्या विरुद्ध जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip) करणारा हजेरी मास्तर अशोक महाजन याला निलंबित करण्यात आले आहे. (Controversial Police inspector Kirankumar Bakale came in trouble)

PI Kirankumar Bakale
Ajit Pawar: खारीक, बदाम खाऊ घालू का तुम्हाला!

स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होऊन तीव्र पडसाद उमटले. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बकाले यांना मंगळवारी मध्यरात्रीच गुन्हेशाखेचा पदभार काढून घेत नियंत्रण कक्षात बदली केली.

PI Kirankumar Bakale
PI Bakale: बकालेंकडून मराठाच नव्हे, अन्य समाजांबद्दलही आक्षेपार्ह टिपणी?

काल समस्त मराठा समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी, राजकीय नेत्यांकडून पोलिस अधीक्षक कार्यालयावर निदर्शने करण्यात आली होती. बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करून खातेंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, खात्यातून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातून मागणी करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने विनोद पंजाबराव देशमुख यांनी आज जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यात नमूद केल्याप्रमाणे, निरीक्षक बकाले यांनी मराठा समाजाला उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य करून शिवीगाळ केल्याच्या व्हायरल क्लिपच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षक डॉ. मुंढे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. बकाले यांची खातेंतर्गत चौकशी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंता यांना सोपविण्यात आली आहे.

बकालेंवरील कलम व शिक्षा...

निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या विरोधात अत्यंत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. यामध्ये कलम १५३(अ)- दोन समूहात,धर्मात भांडण लावण्यासाठी विद्वेष पसरविणे(शिक्षा-३वर्षे), कलम १५३(ब)-राष्ट्रीय एकते विरुद्ध प्रभाव टाकणे, लांच्छन लावणे (शिक्षा-३ वर्षे), कलम १६६-अधिकाराचा गैरवापर करून हानी पोहचवण्याच्या उद्देशाने गैरकृत्य, कलम २९४- सार्वजनिकपणे अश्‍लील संभाषण, कलम ५००-अब्रू नुकसानी, कलम ५०९-नैतिक अधःपतन तथा स्त्रियांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य (शिक्षा-२ वर्षे).

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in