गुन्हा दाखल होऊनही गिरीश महाजन निर्धास्त कसे?, काय आहे कारण...
Girish Mahajan, BJPSarkarnama

गुन्हा दाखल होऊनही गिरीश महाजन निर्धास्त कसे?, काय आहे कारण...

गुन्हा दाखल झाल्याने गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार की पोलिसांची डोकेदुखी?

जळगाव : माजी मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात मंगळवारी जळगाव येथे कोरोना निर्बंध मोडल्याने गुन्हा दाखल झाला. श्री. महाजन यांच्यासह विविध नेत्यांवर यापूर्वीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला श्री. महाजन यांनी फारसे गांभिर्याने घेतलेले दिसत नाही. त्यामुळे असे गुन्हे दाखल केल्याने श्री. महाजन अडचणीत येणार की पोलिसांची डोकेदुखी वाढणार या चर्चेला तोंड फुटले आहे.

Girish Mahajan, BJP
एकीकडे भाजपचे आंदोलन; दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पुढाकाराने भरले ५१ लाखांचे वीज बील!

जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलन, निदर्शनास बंदी आदेश लागू केले असताना सोमवारी भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबेाल आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांविरोधात जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रिपुरा राज्यात घडलेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर मालेगाव, नांदेड, अमरावती येथे बंदचे तीव्र पडसाद उमटून दंगली भडकल्या होत्या. यासंदर्भात हे आंदोलन झाले होते. मात्र गुन्हा दाखल झाला तरीही अद्याप एकाही संशयीताला त्याबाबत कारवाई किंवा नोटीस दिलेली नसल्याने सर्वच निर्धास्त आहे. श्री. महाजन यांच्या विरोधात यापूर्वीही अशी कारवाई झालेली आहे.

Girish Mahajan, BJP
`ओबीसी` समाज कायमस्वरूपी राजकीय आरक्षणाला मुकण्याची भिती!

गतवर्षी कोरोना महामारीची साथ सुरु झाल्यावर शासनाने विविध निर्बंध लागू केले. त्यामुळे सभा, समारंभ, राजकीय कार्यक्रम, आंदोलन, सार्वजनिक समारंभ सर्वांवर निर्बंध आले. प्रारंभी त्याची चांगली धास्ती होती. मात्र विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यावर प्रतिक्रीया देण्यास सुरवात केली. विविध आंदोलने झाली. मोर्चे, घंटानाद अेस कार्यक्रम झाले. गंमतीचा भाग म्हणजे पोलिस हे कार्यक्रम होऊ देतात व नंतर गुन्हा दाखल करतात. त्यात आतापर्यंत एकाही नेत्याला अटक झालेली नाही. त्यामुळे असे गुन्हे दाखल करून पोलिस प्रशासकीय कामकाज वाढवतात. थोडक्यात कागद काळे करतात. नेत्यांना कोर्टात हजर राहण्यासाठी विनंती करतात. त्यामुळे अशा गुन्ह्यांना नेते जुमानत नाहीत.

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कलम ९ किंवा आयपीसी कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल होतो. एक आठवडा ते दोन वर्षे कालावाधीची शिक्षा व दंड होतो. मात्र यामध्ये नाशिक अथवा जळगावला अद्याप कोणालाही अशी शिक्षा झाल्याचे एैकीवात नाही. शिवाय हे सर्व आरोपी कधीच एकत्र येत नाहीत. त्यामुळे कोणीही नेता त्याला गांभिर्याने घेत नाही. अशा गुन्ह्यांचा त्रास राजकीय नेत्यांएैवजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांनाच अधिक परिश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे गुन्हा दाखल होऊनही गिरीश महाजन तसेच राज्यभरातील असंख्य नेते निर्धास्त आहेत.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in