Violence in Sakri Nagarpanchayat Election
Violence in Sakri Nagarpanchayat Electionsarkarnama

साक्रीत निकालानंतर दोन गटांत हाणामारी; भावाला वाचविण्यासाठी गेलेल्या बहिणीचा मृत्यू

भावालादेखील जबर मारहाण झाल्याने तेही जखमी झाले आहेत.

धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री (Sakri) नगरपंचायत निवडणुकीच्या (nagarpanchyat election) निकालाला गालबोट लागले आहे. निकालानंतर दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्या हाणामारीमध्ये भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीचा जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. तसेच, भावालादेखील जबर मारहाण झाल्याने तेही जखमी झाले आहेत. या घटनेमुळे साक्री तणावाचे वातावरण आहे. (Violence in Sakri Nagarpanchayat Election)

दरम्यान, भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीचा जबर मार लागल्याने त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Violence in Sakri Nagarpanchayat Election
शिवसेनेपेक्षा कोणीही मोठे नाही, हे निकालाने सिद्ध : दळवींचा कदम पिता-पुत्रांना टोला!

साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची ३५ वर्षांची सत्ता हिसकावून घेतली आहे. याठिकाणी भाजपने सत्ता मिळविली असून या शिवसेना नेते नाना नांगरे यांना जनतेने धक्का दिला आहे. या नगरपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसलाही दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Violence in Sakri Nagarpanchayat Election
सोलापुरात ‘राष्ट्रवादी पुन्हा...’ : २३ जागा जिंकत पटकावला पहिला क्रमांक!

साक्री नगरपंचायतीत गेल्या ३५ वर्षांपासून सत्ता राखून असलेल्या नाना नागरे यांनाही निवडणुकीत अपयशाला सामोरे जावं लागलं आहे. केवळ चार जागा शिवसेनेला जिंकता आलेल्या आहेत. भाजपने मात्र ११ जागांवर विजय मिळवत आपला झेंडा नगरपंचायतीवर फडकवला आहे. साक्री नगरपंचायतीत भारतीय जनता पक्षाने ११, शिवसेनेने ४, काँग्रेस पक्षाने १ आणि अपक्षाने एक जागा जिंकली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com