धुळ्याच्या खासदाराने शहरातील रस्त्यांची ‘वाट' लावली!
MLA Farukh Shaha News, Dhule Latest Marathi News Sarkarnama

धुळ्याच्या खासदाराने शहरातील रस्त्यांची ‘वाट' लावली!

आमदार फारुक शाह यांचा आरोप; दोन दिवसांत रस्ता दुरुस्तीचे निर्देश

धुळे : शहरातील (Dhule) देवपूर भागातील रस्त्यांची खासदारांसह महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी (BJP) वाट लावली, असा गंभीर आरोप शहराचे आमदार फारुक शाह (Farukh Shaha) यांनी केला. दरम्यान, दोन दिवसांत या रस्त्यांची दुरुस्ती करा, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (MLA Farukh Shaha instructs Corporation for repairing of roads)

MLA Farukh Shaha News, Dhule Latest Marathi News
ओबीसी आरक्षणासाठी राज्य शासन कंबर कसली!

आमदार शाह यांनी गुरुवारी देवपूर भागातील नवरंग जलकुंभ ते दत्तमंदिर चौकादरम्यानच्या रस्त्याची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एजाज शाह, एमजेपी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. (Dhule Latest Marathi News)

MLA Farukh Shaha News, Dhule Latest Marathi News
एक लाखाची लाच घेताना उपनिरीक्षक योगेश ढिकले जेरबंद

भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली. याला खासदार व महापालिकेतील सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप श्री. आमदार शाह यांनी केला. खासदारांना फुकटचे श्रेय घेण्याची सवय असल्याची टीकाही त्यांनी केली. अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना पाच वर्षांपूर्वीची आहे. मात्र, अद्यापही ती पूर्ण झालेली नाही. या योजनेतील अडीअडचणी आपण दूर केल्या. ही योजना लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या अनुषंगाने आपण खूप प्रयत्न केल्याचे म्हणत आपण मात्र याचा कधी वाजागाजा केला नसल्याचेही आमदार शाह म्हणाले.

दोन दिवसांचा अल्टिमेटम

दरम्यान, दोन दिवसांत या रस्त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. देवपूर भागातील रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. याबरोबरच नगावबारी ते मोठ्या पुलापर्यंतचा रस्ताही प्रस्तावित केला आहे.

अंतर्गत रस्त्यांसाठीही निधी आणला आहे. मी क्राँक्रिटचे रस्ते मंजूर करून आणले. मात्र, महापालिकेतील महाभागांनी डांबरी रस्ते प्रस्तावित करा, असे म्हणत या रस्त्यांना मंजुरी दिली नाही, असा आरोपही केला. दरम्यान, देवपूर भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्तीही आपण लवकरच करणार असल्याचे आमदार शाह म्हणाले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in