दादा भुसेंच्या समोरच शेतकऱ्यांच्या '50 खोके मंत्री ओके' घोषणा

मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समोर शेतकरी आक्रमक
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama

धुळे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकार मधली मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवल संताप व्यक्त केला. तसेच भुसे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बंदरे व खनिकर्म मंत्री भुसे आज धुळे दौऱ्यावर होते. यावेळी साक्री तालुक्यातील कासारे येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी जात असताना शेतकऱ्यांनी भुसे यांचा काळे झेंडे दाखवून निषेध केला. विशेष म्हणजे भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांनी मंत्री भुसेंना डावलत कांदा प्रश्नांकडे गांभीर्याने बघण्याची सुचना केली.

Dada Bhuse
शिवसेनेचा Dasara Melava कुठे होणार? किशोरी पेडणेकरांनी स्पष्टचं सांगितलं...

कांद्याला भाव मिळत नाही, साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर केला नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी आंदोलकांनी '50 खोके, मंत्री ओके' अशा घोषणाही दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडत भुसे यांना दखल घेण्यास भाग पाडले.

Dada Bhuse
पैसे भाजपचे घ्या, काम मात्र 'आप'चे करा; केजरीवालांचे आवाहन

दरम्यान, भुसे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक आंदोलक काही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. मात्र, त्यांना मदत होताना दिसत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. शिवाय भुसे यांच्यासमोरच शेतकऱ्यांनी ५० खोके मंत्री ओके, अशा घोषणा देत निषेध केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in