केंद्र सरकारची भीक नको, पण कारवाई आवरा

येवला येथे किसान सन्मान योजनेच्या नोटिसच्या निषेधार्थतहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देण्यात आले.
Farmers given memorandum to Tahsildar
Farmers given memorandum to TahsildarSarkarnama

येवला : तालुक्यात (Yeola) तब्बल १२८३ अपात्र शेतकऱ्यांनी (Farmers) पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेतला आहे. यातील ५१६ लाभार्थ्यांनी घेतलेले अनुदान शासनाला परत केले आहे. मात्र अद्यापही ७६७ जणांनी अनुदान परत न केल्याने तहसील कार्यालयाने अशा शेतकऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. केंद्र शासनाच्या (Centre Government) या धोरणाचा प्रहार संघटनेने निषेध केला आहे. (Farmers given memorandum against PM kisan scheme)

Farmers given memorandum to Tahsildar
राज ठाकरेंना अडवणाऱ्या पहिलवान, साधूंनी आदित्य ठाकरेंचे दिमाखदार स्वागत केले!

या विषयावर प्रहार शेतकरी संघटना आक्रमक झाली असून ‘आम्हाला भीक नको पण कारवाई आवरा असे म्हणण्याची वेळ आल्याचे संघटनेने म्हटले आहे. यासंदर्भात आज प्रहार संघटनेने जोरदार आवाज उठविला.

Farmers given memorandum to Tahsildar
इम्पेरिकल डाटाचे सदोष पद्धतीचे काम थांबवावे!

तालुक्यातील अपात्र लाभार्थ्यांना या योजनेतून मिळालेल्या लाभाची रक्कम शासनास जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली असून संबंधितांनी या रकमेचा त्वरीत भरणा करावा असे आवाहन तहसील कार्यालयाने केले आहे. या रकमेचा भरणा न केल्यास सातबारा उताऱ्यावर बोजा चढवण्याची कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. मात्र ही कारवाई म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे प्रहारने म्हटले आहे. मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत किसान सन्मान निधी नावाची भीक देत शेतकऱ्यांचा अपमानच केला.

कुणी शेतकऱ्याने मागणी केली नाही, कुठल्या संघटनेने आंदोलन केले नसतांना शेतकऱ्यांचे खूप कैवारी आहोत अशी जाहिरात करत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात चार महिन्यात दोन हजार रुपये पाठविण्याची सुरुवात केली. वास्तविक शेतकरी शेतमालाला जास्त नाही, रास्त भाव मागतोय, परवडेल अशा दरात खते, औषध, औजार, वीज, पाणी, वाहतुकीसाठी चांगले रस्ते मागत आहेत.

दस्तुरखुद्द मोदींसाहेबांनीच सत्तेत येण्यापूर्वी स्वामिनाथन आयोग, दीड पट हमीभाव, सातबारा कोरा करू अशी अनेक आश्वासन देत सत्ता काबीज केली. नंतर हेच मुद्दे पद्धतशीरपणे बाजूला सारत वेगळेच भडकवू मुद्दे पुढे करून मूळ प्रश्नांना बगल दिली.

सन्मान निधीच्या नावाखाली न मागता दिलेले पैसे सरकार आता चक्क परत मागतय. तेही सात दिवसात परत करा, अन्यथा जमिनीवर बोजा चढवू अशा नोटिसा दिल्याबाबत प्रहार संघटनेने तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देत कारवाई त्वरित थांबवीण्याची मागणी केली आहे.

----

लाखात लुटून हजारात मदत करून कर्णाची उदारता दाखवणारे हे सरकार आहे. शेतकरी शेतमालाला रास्त भाव मागतोय. त्यासाठी आजवर अनेक आंदोलने झाली, पण फरक पडलेला नाही. आज सरकारी धोरणांमुळे कोणताही शेतमाल असो सरासरी दर क्विंटलला एक हजार रुपयाची लूट होते. हे म्हणजे खिसा कापून गाडी भाड्याला पैसे देत मदत केल्याचा आव आणला जात आहे.

- हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना येवला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com