जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा धंदा!

पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, जिल्हा बँकेच्या चौकशीसाठी `एसआयटी` नेमणार.
Guardian Minister Dada Bhuse
Guardian Minister Dada BhuseSarkarnama

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (NDCC Bank) मोठे थकबाकीदार संचालकांना (Bankrupt Directors) सोडून लहान लहान थकबाकीदार (In arrears) शेतकऱ्यांच्या जमिनी (Farmers Land) लाटण्याचा नवा धंदा सुरू झाला आहे. त्यामुळे यात लक्ष घालून राज्य शासन (State Government) विशेष चौकशी पथक (एसआयटी) लावून बँकेतील गैरव्यवहारांची पाळेमुळे खोदून काढेल, असा इशारा पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिला. (Guardian Minister Dada Bhuse will appoint a SIT for NDCC Bank)

Guardian Minister Dada Bhuse
Uddhav Thackray: मशाली पेटवून शिवसेनेच्या नवीन निशाणीचे उत्साहात स्वागत झाले

जिल्हा बँकेतील आर्थिक बेशिस्तीबाबत सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली होत असल्याकडे आमदारांनी लक्ष वेधले. त्या वेळी श्री. भुसे यांनी हा इशारा दिला.

Guardian Minister Dada Bhuse
आता बकालेंच्या अटकेसाठी शिंदे गटाचा ‘एल्गार’

जमिनी लाटण्याचा धंदा

ते म्हणाले की, बँक ही शेतकऱ्यांची आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे. सक्तीने कर्जवसुली करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर, जमिनी लाटण्याचा उद्योग सुरू झाला आहे. आधी पत नसतांना बोगस कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची कर्ज वाटली. कर्ज लाटणाऱ्या बोगस मोठ्या कर्जदारांकडून वसुली करण्याऐवजी लहान लहान शेतकऱ्यांच्या मालमत्ता हडपण्याचा नवा धंदा सुरू झाला आहे. हे सगळे अवैध आणि चुकीचे आहे. आधी आर्थिक गैरव्यवहार करून बँक खड्ड्यात घालायची त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी लाटायच्या, याची चौकशी केली जाईल.

पीककर्ज वाटपात घपला

बँकेची स्थिती वाईट झाली आहे. बँकेची स्थिती विचारात घेता शासनाने शेतकऱ्यांना कर्ज वाटण्यासाठी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून बँकेला ९२० कोटी दिले. मात्र बँकेने त्यातील जेमतेम ३० ते ३५ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना कर्जरूपाने वाटले. हे सगळ्या गैरव्यवहाराची विशेष चौकशी पथक (एसआयटी) लावून चौकशी केली जाईल. बँकेचा परवाना रद्द होणे, हे प्रगतशील नाशिक जिल्ह्यातील नेत्यांसाठी अजिबात भूषणावह नाही. त्यामुळेच जिल्हा बँकेतील गैरकारभाराची विशेष चौकशी करून पंचनामा करण्याचा इशारा दिला.

संचालकांच्या १६ कोटींचे काय?

बैठकीत श्री. भुसे यांनी बँकेच्या संचालकांकडे १६ कोटी थकीत आहे. त्याची वसुली कधी होणार, किरकोळ मालमत्तापोटी कोट्यवधींचे कर्ज दिली कशी, असा प्रश्न उपस्थित करीत जिल्हा बँकेच्या अडवणुकीबाबत बैठक घेण्याच्या सूचना श्री.भुसे यांनी प्रशासकांना दिल्या.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com