Nashik News; अहो पडळकर, सांगा आता मुके, बहिरे कोण हो?

आमदार गोपीचंद पडळकर यांचे शेतकरी प्रेम खरे की बोलाचीच कढी, अशी चर्चा शेतकऱ्यांत आहे.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama

नाशिक : (Nashik) कांदा (Onion) आणि द्राक्ष (Grapes) उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. गतवर्षी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार मुके आणि बहिरे असल्याची टिका केली होती. सध्या राज्यात भाजपचे (BJP) सरकार आहे. शेतकरी (Farmers) संकटात आहे, मात्र अगदी पडळकर देखील फिरकले नसल्याने, मुके आणि बहिरे कोण? शेतकरी प्रश्न विचारीत आहेत. (Now Nashik Farmers remind Gopichand Padalkar on his question on Government)

Gopichand Padalkar
Nashik News; सदाभाऊ खोत यांची गर्जना हवेतच विरली!

रुई (ता. निफाड) गावात जून २२ मध्ये कांदा परिषद झाली होती. त्यावेळेस सरकार मुके व बहिरे आहेत, अशी टिका आमदार पडळकर यांनी केली होती. सध्या शेतकरी शेतातच कांदा पीक नष्ट करीत आहेत. आंदोलन होत आहे, त्यावर आमदार पडळकर गप्प कसे असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.

Gopichand Padalkar
Budget : मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा मोठा डाव : विधानपरिषद शिवसेनेवर ताबा मिळवण्याच्या हालचाली!

कांदा परिषदेमध्ये पडळकर यांनी महाविकास आघाडीचे सरकार बहिरे, आंधळे अन मुके असल्याचे संबोधले होते. प्रवीण दरेकर यांनी या कांदा परिषदेत बोलताना ४० वर्ष उलटूनही कांद्याचे प्रश्न कायम आहेत, याची खंत आहे.

सरकार बदलले असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी तेव्हा रडणारे, गळा काढणारे आत्ताचे सत्ताधारी आता मूग गिळून गप्प का असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. व्यासपीठावरून मोठमोठी लांबलचक भाषणे करताना आपल्याला शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा, बळीराजा अशा अनेक प्रकारच्या उपमा देवून त्यांची भलावण करतात; परंतू प्रत्यक्षात मदत करण्याची वेळ आल्यावर हजार कारणे सांगितली जातात, असे सांगितले होते.

गेल्या दोन आठवड्यापासून हा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी बाजार समितीचे लिलाव बंद पाडत आहेत. रोज आंदोलन होत आहे. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. केंद्र सरकारच्या धोरणाने कांदा दर कोसळ्याची तक्रार आहे. याबाबत सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी देखील शासनाचे लक्ष वेधले आहे. राज्य सरकारने कांद्याला अनुदान न दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा तेव्हा दिला आहे. आता त्या घोषणा विसरले की काय? प्रश्न केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com