शेतकरी देशाचा कणा;त्याच्याप्रती संवेदनशीलता हवी!

आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते राज्यस्तरीय परिवार भूषण पुरस्काराचे वितरण
Dr. Sudhir Tambe with awardee Farmer.
Dr. Sudhir Tambe with awardee Farmer.Sarkarnama

नाशिक : देशामध्ये (India) शेती, (Farming) आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते समजून घेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी सामाजिक जाणीव असलेल्या लोकांनी पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक चळवळी विस्तारल्या पाहिजेत. त्यामध्ये शेतकरी (Farmers) हा देशाचा मुख्य कणा आहे. त्यामुळे त्याच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांविषयी संवेदनशीलता हवी, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी केले. (Government as well we should sensetive towards farmers)

Dr. Sudhir Tambe with awardee Farmer.
`साहेब, आम्ही गद्दार नाही ,तुम्हाला सोडून जाणार नाही`

येथील 'महाराष्ट्र माझा परिवार' संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते सामाजिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत माऊली सेवा प्रतिष्ठान (शिंगवे नाईक, नगर)चे संचालक डॉ. राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे यांना सपत्नीक 'राज्यस्तरीय परिवार भूषण पुरस्कार'प्रदान करण्यात आला.

Dr. Sudhir Tambe with awardee Farmer.
चंद्रकांत रघुवंशी आमदारकीच्या लालसेने शिंदे गटात गेले!

भाषण कला प्रशिक्षक शशांक मोहिते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार राहुल ढिकले, नगरसेवक उद्धव निमसे, राहुल दिवे, प्रशांत दिवे, छावा क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष नारायण वाजे, सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, संस्थेचे संस्थापक विकास भागवत, अध्यक्ष धोंडीराम रायते, सचिव शिवनाथ कापडी, राजाराम मुंगसे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, भारत हा विद्वान लोकांचा देश आहे. मात्र अनेक प्रश्न गंभीर होत चालले आहेत. राजकीय नेत्यांनी आता चिंतन करण्याचा गरज आहे. चांगले समाजकारण म्हणजेच चांगले राजकारण निर्माण करणे होय. शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळणे गरजेचे आहे. शहरी भागातील ग्राहकांमध्ये जनजागृती असायला हवी. त्यासाठी उपक्रम, कार्यक्रमांत शेतमालाचा खप कसा वाढेल यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

जागतीक स्तरावर १५०० प्रदूषित शहर जाहीर करण्यात आली होती. त्यात देशातील १२ शहरे आहेत. अंधश्रद्धा, झुंडबळी असे गंभीर प्रकरणे पुढे येत आहेत. त्यामुळे सामजिक चळवळीचा आदर्श घ्यायला हवा. आपण महासत्ता बनण्याचे वर्णन करतो. मात्र चांगला भारत घडविण्यासाठी सामाजिक दायित्व असेल तर देश पूढे जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास माजी आमदार योगेश घोलप, व्यापारी बँकेचे चेअरमन निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक रमेश धोंगडे, नगरसेवक बाजीराव भागवत, माजी नगरसेवक सुनील बोराडे, राष्ट्रवादीचे गणेश गायधनी, मनोहर कोरडे नितीन चिडे, यांसह सामाजिक कार्यकर्ते राजेश फेकणे, शिवा ताकाटे, सागर भोजने, योगेश निसाळ आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com