शेतकरी वाऱ्यावर सोडून महाराष्ट्र जेरबंद कशासाठी करता?

भाजपतर्फे आज येथे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर जागर मेळावा झाला.
शेतकरी वाऱ्यावर सोडून महाराष्ट्र जेरबंद कशासाठी करता?
Girish MahajanSarkarnama

नाशिक : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ओबीसी घटकांच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालायत राज्य शासनाने गांभिर्याने भूमिका पार पाडली नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले. राज्य सरकारने या दोन्ही घटकांवर खुप मोठा अन्याय केला आहे, असा आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला.

Girish Mahajan
आमदार सरोज अहिरे शिवसेनेला खरोखर शिंगावर घेतील?

भाजपतर्फे आज येथे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर जागर मेळावा झाला. या मेळ्यावाला केंद्रीय राज्यमंत्री डॅा भारती पवार, माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार राहूल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री राम शिंदे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, योगेश टिळेकर, संजय कुटे, माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे, धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे, लक्ष्मण सावजी, विजय साने, चंद्रकांत थोरात शंरराव वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Girish Mahajan
सोमवारी दिसेल का शिवसेनेचा `तो` बंद म्हणजे बंद!

श्री महाजन म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाज घटकांवर फार मोठा अन्याय केलेला आहे. त्यांच्या निष्क्रीयतेमुळे ओबीसी घटकांचे आरक्षण काढून टाकण्यात आलेले आहे. त्यांनी जर न्यायालयीन प्रक्रीयेत गांभिर्याने लक्ष घातले असते तर हे टाळता आले असते. सरकारमधील मंत्री मेळावे घेत आहेत. राज्यभर फिरत आहेत. दौरे करीत आहेत.माझं त्यांना एव्हढेच म्हणने आहे, की तुम्ही सत्तेत आहात. तुम्हाला कायदा करता आला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, यांनी जो ऑर्डीनन्स काढला होता, त्याचे कायद्यात रुपांतर करता आले नाही.

राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. या तिन्ही पक्षांची तोंडे तीन दिशेला आहेत. एकाच बाजुला त्यांची तोंडे नसल्याने हे सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत. अर्ध्या मंत्रीमंडळाला वाटते मराठा समाजाला आरक्षण मिळायला नको. अर्ध्या मंत्र्यांना वाटते ओबीसींना आरक्षण मिळायला नको. त्यामुळे आज ही स्थिती निर्माण झालेली आहे. त्यात श्री. फडणवीस यांनी मराठा समाजाला जे आरक्षण दिले होते, ते यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. ओबीसींच्या बाबत देखील हेच घडले. त्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे. त्याने ओबीसींवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळे आम्ही राज्यभर ओबीसी जागर मोहीम हाती घेतली आहे.

महाराष्ट्राला वेठीस का धरता?

श्री. महाजन म्हणाले, सोमवारी केंद्र सरकारचे कृषी कायदे व लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने राज्यात बंद पुकारला आहे. त्यावर श्री. महाजन यांनी टिका केली. ते म्हणाले शरद पवार या सरकारचे नेते आहेत. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था खुपच वाईट आहे. अतिवृष्टीने सर्व पीके नष्ट झाली आहे. गेल्या दोन वर्षात शेतीचे नुकसान झाले मात्र एकाही शेतकऱ्याला अद्याप दमडी फेकून मारलेली नाही. राज्य सरकारने एक रुपयाचीही मदत कोणाला दिलेली नाही. शेतकरी, व्यापारी, नागरिक संकटात सापडले त्यांना मदत करत नाहीत, मात्र उत्तर प्रदेशात पाच शेतकरी मेले तर त्यासाठी सबंध महाराष्ट्राला जेरबंद करत आहेत. ती घटना दुर्दैवी आहे, पण त्यासाठी कोणी समर्थन करीत नसले तरी शेतकऱ्यांकडे कोणी ढुंकून पहात नाहीत. व्यापारी, नागरिकांना वेठीस धरीत आहेत. ही राजकीय घोषणा आहे, त्याला कोणीही प्रतिसाद देणार नाही.

...

Related Stories

No stories found.