Onion News; भाजपच्या मतदारसंघात कांदा आंदोलन पेटणार?

कांद्याला हमीभाव, अनुदान व इतर मागण्यांबाबत उद्या (ता.3) चांदवड येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
Dr. Rahul Aher & Shirish Kotwal
Dr. Rahul Aher & Shirish KotwalSarkarnama

नाशिक : जिल्ह्यासह (Nashik) चांदवड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पीक (Onion) घेतले जाते. या कांद्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. यंदा शेतक-यांनी (Farmers) मोठ्याप्रमाणात लेट खरीप लाल कांद्याची लागवड केली आहे. मात्र सद्यस्थितीत कांद्याला ४ ते ५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. एकीकडे देशात महागाई व शेतमालाला मात्र कवडीमोल भाव असा विरोधाभास आहे. या विरोधात काँग्रेसचे (Congress) माजी आमदार शिरीष कोतवाल (Shirish Kotwal) बेमुदत उपोषण करणार आहेत.(Farmers will go on Hunger strike from tomorrow in Chandwad)

Dr. Rahul Aher & Shirish Kotwal
Nashik News; घोषणा फोल, एक कांदा देखील सरकारने विकत घेतलेला नाही!

याबाबत तहसीलदार प्रदीप पाटील, चांदवड पोलीस ठाण्यात आज निवेदन देण्यात आले. कांद्याला हमीभाव, अनुदान व इतर मागण्यांसाठी काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांसह विविध शेतकरी व नेते या उपोषणात सहभागी होणार आहेत. त्यामुळे चांदवड मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल म्हणाले, कांदा लागवडीपासून तर काढणीपर्यंत सरासरी दोन हजार रुपये खर्च येतो. मात्र भाव पाचशे रुपये मिळतो. एक प्रकारे राज्य शासन शेतकऱ्यांकडून दिड हजार रुपये वसुली करून ते केंद्र शासनाला देत आहे.

Dr. Rahul Aher & Shirish Kotwal
BJP News; भाजप म्हणते महापालिका प्रशासक ‘जबाब दो’

देशामध्ये महागाईचा भस्मासुर माजलेला असतांना शेतकऱ्यांच्या पदरी फक्त कवडीमोल भाव मिळतो आहे. मागील ५ ते ६ वर्षांपुर्वी कांद्यास ५ ते १० रुपये भाव मिळत होते. त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची महागाईचा तुलनात्मक विचार करता आजची शेती न परवडणारी झालेली आहे.

शेतीसाठी बियाणे, रासायनिक खते, औषधे, मजुरी, ट्रान्सपोर्ट इत्यांदींच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. त्या तुलतेने शेतीमालाचे बाजारभाव आहे त्याच किंमतीत विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती उपासमारी, कर्जबाजारीची बनली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली पीके शेतातच नष्य केली आहेत. त्यासाठी चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

Dr. Rahul Aher & Shirish Kotwal
NCP News; अंबादास खैरे यांनी पाच एकर कोबीवर फिरविला नांगर

केंद्र व राज्य शासन जाणूनबुजून शेतक-यांचे आर्थिक हाल होवून शेतकरी कर्जबाजारी व्हावा, अशीच अपेक्षा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रश्नावर आमरण उपोषण केले जाईल. असा इशारा माजी आमदार कोतवाल, काँग्रेसचे तालुका अद्यक्ष संजय जाधव, विजय जाधव, भाऊसाहेब शेलार, अन्वर पठाण, सागर निकम, दिपांशु जाधव, भारत ढगे, साहेबराव ठोंबरे, किसनराव जाधव, दत्तू मामा ठाकरे आदींना सरकराला इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com