दिल्लीचं तख्त हादरवणारे झुंजार शेतकरी नेते माधवराव मोरेंचे निधन

शेतकऱ्यांचा आधारवड हरपला, पिंपळगावात आज अंत्यसंकार
Madhavrao More
Madhavrao MoreSarkarnama

पिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांच्या (Farmers right) न्याय हक्कासाठी दिल्लीचं (Delhi Government) तख्तही हादरवून सोडणारे, शेतकऱ्यांना आर्थिक (Financial security) स्वातंत्र्याचा मंत्र देणारे शेतकरी संघटनेचे (Shetkari Sanghtana) झुंजार, लढवय्ये नेते माधवराव खंडेराव मोरे (८८) (Madhavrao More) यांचे बुधवारी निधन झाले. (Shetkari Sanghtana leader Madhavrao More passed away in Nashik)

Madhavrao More
गुलाबराव पाटील, तुमच्यावर फडणवीसांनी कोणती भानामती आहे?

काल रात्री साडेसातच्या सुमारास राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनामुळे शेतकरी चळवळीचा बुलंद आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांवर शोककळा पसरली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भल्या भल्या नेत्यांच्या तोंडचे पाणी पळवणारे माधवराव मोरे हे शेवटपर्यंत शेतकऱ्यांचे हक्क व आर्थिक विकासासाठी व त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी झटत राहिले.

Madhavrao More
कायदा मोडणाऱ्यांना डीएसपी एम. राजकुमार यांची तंबी

शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक लढा उभारणारे माधवराव मोरे यांची प्रकृती गेली दोन वर्षांपासून खालावली होती. शेतकऱ्यांसाठी छेडलेल्या आंदोलनात झालेल्या पोलिसांच्या लाठ्याचे घाव त्यांना वार्धक्यात असह्य होत होते. पिंपळगाव बसवंतमध्ये १९८० मध्ये कांदा व उसाला हमीभाव मिळावा, यासाठी झालेल्या आंदोलनात शेतकरी व पोलिस यांच्यात धुमचक्री झाली. आंदोलनात गोळीबार झाला; पण ते मागे हटले नाही.

माधवराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने राज्यासह दिल्लीचे राज्यकर्ते हादरले होते. राज्यभरात त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने शेतकऱ्यांमध्ये न्याय हक्काची भावना जागविली. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हक्कांचे व्यासपीठ उपलब्ध करून संघटित करण्यात माधवराव मोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शरद जोशी यांनी माधवराव मोरे यांची साथ घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जागर केला. माधवराव मोरे यांनी शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडून अनेक मागण्या मान्य करून घेतल्या.

शेती अन उद्योगांची पायभऱणी

शेतकऱ्यांसाठी जाज्वल्य विचार, वक्तृत्व, संघटन अशी त्यांची ख्याती होती. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजकीयपदाची संधीला त्यांनी ठोकर मारत निःस्वार्थपणे शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचले. शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगाची त्यांनी पायाभरणी केली. द्राक्षापासून वाइनची निर्मिती, बेदाणाप्रक्रिया, महाराष्ट्रातील पहिले वाइन पार्क विंचूर येथे त्यांनी मंजूर केले. जऊळके वणी येथील पिंपेनचा वाइन प्रकल्प, पिंपळगाव बसवंत येथील औद्योगिक वसाहत या प्रकल्पाची स्थापना माधवराव मोरे यांनी केली. शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी आयुष्य वेचणारे माधवराव मोरे यांना ‘नाना’ या नावाने आदराने संबोधले जायचे.

अल्पपरिचय

माधवराव मोरे यांचा जन्म 22 मे १९३७ मध्ये झाला. पिंपळगाव हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण-जुनी मॅट्रीकचे शिक्षण घेतले. सन १९८० चे पिंपळगांव आंदोलन त्यांच्या नेत्तृत्वाखाली प्रचंड गाजले. चांदवड येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये त्यांनी शेतकरी महिलांचे भव्य अधिवेशन भरविले. लाखोंच्या सभा गाजवितांना उपस्थित शेतकऱ्यांना शिव्या हासडत स्वाभीमान जागविण्याची त्यांची वक्तृत्व शैली टाळ्या मिळवून जायची. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारताना अध्यात्मिक, धार्मिक यासह शेती विषयावर त्यांचे अफाट वाचन होते. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. सन १९६७ मध्ये त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना विकासाच्या योजना राबविल्या.

भारत सरकारची शेतकऱ्यांबद्दलची धोरणे आणि त्यामुळे त्यांची झालेली दैन्यावस्था पाहून ते प्रचंड अस्वस्थ व्हायचे. शेतकरी विरोधी व्यवस्था मोडून काढण्यासाठी त्यांनी ८० च्या दशकात शेतकऱ्यांचे संघटन सुरू केले. द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकर्यांना त्यांनी प्रवृत्त केले.महाग्रेप्सचे ते संस्थापक होते.हायब्रीड टोमॅटोच्या लागवड करणारे ते पहिले शेतकरी होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com