पैशांसाठी तीन हजार नागरिकांना लस न देताच प्रमाणपत्र दिले!

बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपींची संख्या वाढतच चालली.
Covid bogus vaccination in Dhule
Covid bogus vaccination in DhuleSarkarnama

धुळे : डोस न देता बनावट लसीकरण (Vaccination) प्रमाणपत्र घोटाळाप्रकरणी मारुतीच्या शेपटासारखी आरोपींची यादी वाढण्याचे संकेत आहेत. यात शहरातील (Dhule) लोकप्रतिनिधींच्या दबावाबाबतही चर्चा उसळते आहे. जावेद, बारी, पठाणसह अन्य काही सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेतील पाच ते सहा नर्स, आशा वर्कर पोलिसांच्या रडारवर आहेत. महापालिकेचा आरोग्य विभागाचा प्रमुख अधिकारीच डॉ. महेश मोरे व तीन साथीदार अटकेत असल्याने इतर आरोपींची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट चित्र आहे.

Covid bogus vaccination in Dhule
जळगावच्या वादात ‘भगीरथ’ एकनाथ खडसे मोठे की ‘आरोग्यदूत’ गिरीश महाजन?

मालेगाव कनेक्शन असलेल्या येथील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेअंतर्गत डोस न देता महापालिकेच्या यंत्रणेने थेट बनावट प्रमाणपत्र वितरित केल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या फिर्यादीनुसार आर्थिक फायद्यासाठी तीन हजारांवर बनावट प्रमाणपत्र वितरित केल्याचे समोर आले आहे. मात्र, ही संख्या आठ ते दहा हजाराच्या घरात असल्याचा आरोप भाजपसह शिवसेनेने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस यंत्रणेने गतीने तपास चक्रे फिरवत आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. प्रशांत पाटील, ब्रदर उमेश पाटील आणि कंत्राटी कर्मचारी अमोल पाथरे याला अटक केली आहे.

Covid bogus vaccination in Dhule
सुमंत रुईकरांचा संकल्प नाशिकचे `हे` शिवसेना कार्यकर्ते पूर्ण करणार!

आरोग्य विभागाची चौकशी व्हावी

पोलिसांना निपक्ष कारवाईमुळे महापालिकेतील राजकीय व प्रशासकीय मंडळी हादरली आहे. नेहमीप्रमाणे आपले काहीही बिघडणार नाही, बोंब मारणाऱ्यांना बोंब मारू देत, प्रकरण रफादफा करू, अशा आविर्भावात असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. या कारवाईचे शहरातून स्वागत होते. आरोग्य विभाग भ्रष्टाचाराने बरबटलेला असून त्याची सखोल चौकशी केली तर या विभागातील इतर बरेच अधिकारी, कर्मचारी गोत्यात आल्याशिवाय राहणार नाहीत हे वास्तव आहे. यात बनावट लसीकरण प्रमाणपत्राने महापालिकेला आता उतरती कळा लागल्याचे बोलले जात आहे.

घोटाळ्यात कोण हे उघड गुपित?

दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठाणल्याचे दिसते. अटकेतील संशयितांना खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी आता या घोटाळ्याशी संबंधित अनेकांची नावे उजेडात आणण्यास सुरवात केली आहे. असे असले तरी शहरात या घोटाळ्यात कोण- कोण सहभागी आहेत, लोकप्रतिनिधींचाही दबाव होता किंवा कसे? अशा बाबी आता चर्चेतील उघड गुपित झाले आहे. मोगलाई, मौलवीगंज, कबीरगंज, गुरुद्वारा परिसर यासह ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर बनावट लसीकरण प्रमाणपत्र वितरित झाले आहेत. त्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवकही सहभागी असल्याचे बोलले जात आहे.

तपासाला यांची सहकार्याची गरज...

महापालिकेतील काही नर्स, आशा वर्कर यांना घोटाळ्याबाबत नेमके काय घडले याविषयी बरेच काही माहिती आहे. त्यांनी समाजहितासाठी पोलिसांना तपासात सहकार्य करण्यासाठी पुढे येण्याची गरज व्यक्त होते. डोस न घेता बनावट प्रमाणपत्र मिळविणारे महाभाग समाजासाठी संकट निर्माण करणारे ठरले आहेत. त्यांच्यामुळे निष्पाप नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडण्याची भीती असेल. त्यामुळे बनावट प्रमाणपत्रधारकांवर कारवाई होणे आवश्‍यक ठरते. त्यांनीही पोलिसांना तपासात सहकार्य केले तर घोटाळेबाजांचे रॅकेट उद्ध्वस्त होऊन समाजहित जोपासले जाणार आह

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com