फडणवीस, भाजपचा संघटनमंत्री तरी ओबीसी करून दाखवा!

माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपचा डीएनए उच्चवर्णीयांचा असल्याची टिका केली.
फडणवीस, भाजपचा संघटनमंत्री तरी ओबीसी करून दाखवा!
Anil Gote & Devendra FadanvisSarkarnama

नाशिक : भाजपचा (BJP) डीएनए ओबीसींचा (OBC) आहे, असे हास्यास्पद विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) डीएनए ओबीसी नव्हे तर उच्चवर्णीयांचा आहे, अशी टिका माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी केली आहे. (Anil Gote said, BJP`s DNA is not OBC but Highercast)

Anil Gote & Devendra Fadanvis
चंद्रकांतदादा तुम्हीही मसणात जाणारच आहात ना!

या संदर्भात श्री. गोटे यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी श्री. फडणवीस तसेच भाजपवर टिका केली आहे. फडणवीस यांचे विधान हास्यास्पद आहे. भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे, असे ते म्हणतात. मुळात महाराष्ट्र प्रदेश भाजप हा स्वार्थी लोकांचा कळप आहे. भाजपचा डीएनए उच्चवर्णीयांचा आहे. भाजपच्या कार्यालयात संघटनमंत्री हे एक पद असते. त्या पदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमणूक करीत असते. संघाकडून नेमलेला या पदावरील माणुस उच्चवर्णीय असतो.

Anil Gote & Devendra Fadanvis
राष्ट्रवादीचा बसपला धक्का; नगरसेविकेसह माजी नगरसेवक पतीचा पक्षप्रवेश

ते पुढे म्हणाले, फडणवीस यांच्या खरोखऱ हिंमत असेल तर त्यांनी त्या पदावर ओबीसी समाजाच्या व्यक्तीची नियुक्ती करून दाखवावी. भाजपची पितृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ओबीसी आरक्षणाला पाठींबा आहे, असे जाहीर करावे. कारण मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणा धोरणाला विरोध आहे. त्यामुळे ते अशी भूमिका घेऊच शकत नाही.

फडणवीस सत्तेत असताना धनगर व मराठा आरक्षणासाठी त्या समाजाच्या घटकांना त्यांनी झुलवत ठेवले. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण लागू होऊ नये यासाठी त्यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात कारस्थान केले. तसे झाले नसते तर या दोन्ही समाजांना आरक्षण मिळाले असते, असा दावा श्री. गोटे यांनी केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in