गटबाजीतच काँग्रेसचे निम्मे खच्चीकरण होते, ते टाळा!

काँग्रेस पक्ष जात-धर्म, कट्टरता हे हिटलरचे राजकारण संपवेलच!
Revenue Minister Balasaheb Thorat
Revenue Minister Balasaheb ThoratSarkarnama

नाशिक : काँग्रेस (Congress) पक्षात गट, तट, वाद हेच आपले खच्चीकरण करते. आपल्याला आधी ते टाळले पाहिजे. काहीही असो, नेतृत्व असेल त्याच्या पाठीशी उभे रहायचे. वाद विवाद टाळले पाहिजे. तसे केले तर पक्षाला यश नक्की मिळेल, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला.

Revenue Minister Balasaheb Thorat
आदित्य ठाकरेंच्या धडाडीच्या निर्णयाने वाचला २०० वर्षे जुना वटवृक्ष!

आज देशात भाजप, राऱएसएस, मोदी जे करीत आहे, ते सोपे, तकलादू राजकारण आहे. काँग्रेस देश, समाज, समता आणि त्यातून सर्व घटकांची, देशाच्या समृद्धीचे राजकारण करतो. तेच वास्तव, सत्य टिरकाल टिकणारे आहे, यावरच आपल्या सबंध भाषणात त्यांचा भर होता. ते म्हणाले, सध्याच्या लाटा येतील, जातील मात्र काँग्रेसचा विचारच टिकेल. हा विचार आपल्याला मुंबई महापालिकेत लोकांमध्ये जाऊन सांगायचा आहे. त्यातून यश नक्की मिळेल.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसदर्भात इगतपुरी येथे झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचा विचार, आचरण, इतिहास व वाटचाल याबाबत अतिशय विस्तृत मार्गदर्शन केले.

Revenue Minister Balasaheb Thorat
मुंबई महापालिकेतील स्वबळासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा कानमंत्र!

ते म्हणाले, जनतेसाठी काम करणे, आपले ध्येय गाठणे यासाठी आपल्याला काम करावे लागेल. त्यातून आगामी काळात मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल हे नक्की. याची मला खात्री आहे. मुंबईची सध्याची टीम खुप चांगली आहे. तुम्ही लढायचे नक्की करा, यश नक्की आहे.

श्री. थोरात म्हणाले, कठीण काळातून काँग्रेस पक्षच नव्हे तर काँग्रेसचा विचार कठीण काळातून वाटचाल करीत असल्याचे आपल्या सगळ्यांना दिसते आहे. हे फक्त भारतातच नव्हे तर जगभर ही स्थिती आहे. जगभर एक अशी लाट आलेली दिसते की, काही लोक टोकाच्या काही गोष्टी करून त्यावर आधारीत राजकारण करीत आहे. अमेरिकेत ट्रम्प यांनी कृष्णवर्णीयांविरोधात वातावरण निर्माण करून तीथे सत्ता मिळाली. त्यानंतर काय झाले?. ते पराभूत झाले. मत बरी पडली. मात्र ते लोकप्रिय अजिबात राहिलेले नाहीत. आता त्यांच्याबाबत नकारात्मक वातावरण दिसते. कृष्णवर्णीयांविरोधात त्यांनी वातावरण निर्मिती केली. तुर्कस्तानमध्ये देखील कमाल पाशा यांनी देश मुस्लीमबहुल आहे, मात्र त्यांनी जाती धर्माच्या पलिकडे जाऊन सर्वांना आदर देणारा देश निर्माण केला. अलिकडच्या काळात गेल्या दोन- तीन वर्षात तीथे कट्टरवाद पुढे आला. ते सत्तेत आला. मात्र त्याला विचारवंतांचा विरोध आहे. लोक आम्हाला कमाल पाशाचाच तुर्कस्तान हवा असे बोलू लागले.

ते पुढे म्हणाले, हिटलर असो, ट्रम्प असो वा कट्टरवाद पसरवण्याचे सोपे राजकारण भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज देशात करीत आहे. त्या पध्दतीने राजकारण सुरु आहे. त्यात आपली राज्यघटना, त्यातील तत्व, भूमिका याला मोठा धोका निर्माण झाला आहे. ही राज्यघटना काही सहज निर्माण झालेली नाही. त्यात अनेक परंपरा समाविष्ट आहेत. त्यात गौतम बुद्ध, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर अशा देशभरातील अनेक संतांच्या, समाज सुधारकांच्या विचारांचा, परंपरांचा वारस आहे. देश, समाज, लोकमाणस कसे असले पाहिजे याचा विचार करून त्याची निर्मिती झाली. ते समतेचे, माणसाला मामसासारखे वागविणारा मानव धर्माचा पुरस्कार करणारे तत्व आहे. जे खरे तत्वज्ञान आहे.

श्री. थोरात म्हणाले, त्या सर्व विचारांचा परिपाक, पिढ्यान पिढ्या आलेले समतेचे, समाजवाद, स्वातंत्र्याचे तत्व डॅा बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली राज्यघटनेत समाविष्ट केले. दलीत, शोषीत, गरीबांना आज किंमत आहे, ती मताचा अधिकार आहे म्हणून. तुम्ही कितीही मोठे असा, निवडणूक आली की गरीबाच्या दारात जावे लागते. हात जोडावे लागतात. मध्यंतरी पाय धुण्याचा कार्यक्रम झाला. कशामुळे झाला. केवळ राज्यघटनेमुळे झाला. मला तुझे मतं पाहिजेत, यासाठी झाला. हे विसरायचे नाही. देश पुढे न्यायचे असेल तर राज्यघटनेचे जतन व संरक्षण करावे लागेल. हेच काम काँग्रेसने केले. हाच काँग्रेसचा विचार आहे.

ते पुढे म्हणाले, कोणत्या तरी जाती, धर्म, वर्णाविषयी द्वेषाचे राजकारण करायचे. ही हिटलरची पद्धत होती. त्यातून जाती, धर्म, पंथाचे राजकारण करून मते मिळवणे अशा पद्धतीचे सोपे राजकारण करायचे. मात्र काँग्रेस पक्ष प्रदिर्घ काळ सर्वांना बरोबर घेऊन, विकास व देशाच्या प्रतिष्ठेसाठी जो विचार, राजकारण करीत आला, ते अतिशय अवघड राजकारण आहे. भारतीय जनता पक्ष, संघ आणि त्यांची विचारसरणी काँग्रेसचा सर्वात मोठा शत्रु आहे. त्याच्याशीच आपल्याला लढायचे आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com