Nashik Congress News : कर्नाटकाच्या विजयोत्सवातही तीन गटांच्या तीन तऱ्हा!

एकोप्याने लढल्याने कर्नाटक जिंकलेल्या काँग्रेसचा आनंदोत्सवात गटबाजीचे प्रदर्शन
Nashik Congress celebration
Nashik Congress celebrationSarkarnama

Nashik Congress News : देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष बहुमताने सत्तेत येत आहे. त्याचा काँग्रेस कार्यकर्ते, नेत्यांनी देशभर जल्लोष केला. नाशिकमध्ये मात्र शहरात तीन ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा जल्लोष करण्यात आला. आधीच तोळा-मासा संघटन असलेल्या पक्षात आकाश छाजेड अध्यक्ष झाल्यापासून तीन गट निर्माण झाले आहे. (There are three groups in Nashik city congress)

नाशिक (Nashik) शहर काँग्रेसला (Congress) प्रदिर्घ काळ प्रभारी अध्यक्ष होते. यंदा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आकाश छाजेड यांची नियुक्ती केली. मात्र नियुक्ती विश्वासात न घेता केली,तसेच श्री. छाजेड पदावर नव्हते तेव्हा पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमात फिरकलेही नाही, असा आक्षेप घेत तीन गट तयार झाले.

Nashik Congress celebration
Shivsena News : संजय राऊत अडचणीत, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

कर्नाटक मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल नाशिक शहर काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांच्या हस्ते महागाईला विरोध म्हणून प्रतिकात्मक गॅस सिलिंडरची पूजा करून नंतर कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल -ताशे तसेच सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या विजयाच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला.

कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल, सिराज कोकणी, नगरसेविका वत्सलाताई खैरे, नगरसेविका आशाताई तडवी, हनीफ बशीर, अल्तमश शेख, महिला शहराध्यक्षा स्वाती जाधव, ज्ञानेश्वर काळे, संतोष ठाकूर, बबलू खैरे, विजय पाटील, जुलीताई डिसूझा, अतिशा पैठणकर, अरुणा आहेर, उषाताई साळवे, कुसुमताई चव्हाण, साजिया शेख, सोफिया पठाण, गुड्डी खान, वाजेदा मिर्झा, अरुण नागरगोजे आदी उपस्थित होते.

Nashik Congress celebration
Karnataka effect : शिवसेनेला बसणार असा फटका...शिंदे सरकार निवडणुका लांबवणार?

मारू गटाच्यावतीने पेढे वाटप

शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने शालीमार येथील इंदिरा गांधी पुतळा येथे इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश मारू, गोपाळ जगताप, जयेश पोकळे, सचिन दीक्षित, रोहन कातकडे, रमेश मकवाना, रतिष मारू, सिद्धार्थ दलोड, अरुण निकम, श्याम महाजन, देवेन मारू, मनोज मकवाना, धीरज रेवर, मनोज पाटील, नरेश सुमरा, अनिल मकवाना, साबीर शेख, रियाज पठाण, दिनेश चव्हाण, रवी मारू आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सेवादलाकडून मिठाई वाटप

नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाने सिन्नर फाटा येथील महाबली हनुमंत रायाची पूजा करून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी सेवादलाचे अध्यक्ष डॉ वसंत ठाकूर, नाशिक रोड ब्लॉक अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे, उपाध्यक्ष उमेश चव्हाण, लहू जाधव, संतोष हिवाळे, सिराज खान, दीपक धवर, बाळासाहेब आहेर, राजेंद्र बनसोडे, संजय पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. हा लोकशाहीचा विजय असल्याचे ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

Nashik Congress celebration
Jalgaon News : महाविकास आघाडीसारखा प्रयोग केल्यास भाजपचा पराभव अटळ!

शहर काँग्रेसची संघटनात्मक स्थिती अतिशय नाजुक आहे. मोजकेच पदाधिकारी दिसतात. अशा स्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकोपा अपेक्षित आहे. मात्र अध्यक्ष छाजेड यांना सर्वांना एकत्र करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे तीन गटांची तोंडे तीन दिशेला अशी स्थिती आहे. प्रत्येक गट एकमेकांवर आरोप करत असल्याने काँग्रेस पेक्षा त्याच्या गटबाजीचीच अधिक चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com