पक्षविस्तार हवा तर, धुळ्यात भाकरी फिरवा अन्‌ मंत्रिपद द्या!

धुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची अपेक्षा पक्षश्रेष्ठींकडे अपेक्षा
Congress symbol
Congress symbolSarkarnama

धुळे : धुळे (Dhule) ग्रामीण विधानसभा मतदारसंघ वगळला तर इतर चारही मतदारसंघात काँग्रेसची (Congress) अस्तित्वाची लढाई सुरू आहे. या पक्षाचे उरलेले एकमेव नेतृत्व माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्यावर कार्यकर्त्यांची भिस्त आहे. यात पक्षाला ऊर्जितावस्थेसाठी धुळे शहराप्रमाणे जिल्हा कार्यकारिणीत भाकरी फिरवावी आणि केवळ जिल्हाच नाही तर खानदेशात काँग्रेसने तग धरावा यासाठी आमदार पाटील यांना मंत्रिपद बहाल करावे, अशी अपेक्षाही कार्यकर्ते व्यक्त करतात.

Congress symbol
कामे महाविकास आघाडीची; निवडणूक तयारी राष्ट्रवादीची!

राज्यात महाआघाडीची सत्ता आणि त्यात काँग्रेस घटक पक्ष असला तरी धुळे ग्रामीण मतदारसंघ वगळता जिल्ह्यात या पक्षाची हलाखीची स्थिती होत चालली आहे. असे असताना राज्यात ठिकठिकाणी जिल्हा बँकांसह विविध निवडणुकांत काँग्रेसने संघर्षाची भूमिका घेत सत्तेत स्थान मिळविण्याचा प्रयत्न केला. तसे चित्र जिल्ह्यात दिसून येत नाही. त्यामुळे काही निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या ठोस भूमिकेअभावी अपेक्षाभंग झाल्याचे कार्यकर्ते बोलतात.

Congress symbol
शिवसेनेचा संकल्प, एक लाख महिलांना रोजगार देणार!

जिल्हा बँकप्रश्‍नी सोयीची भूमिका

धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप नेते आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची स्थापना झाली. तीत काँग्रेसचा सहभाग होता. त्यानुसार या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर व धुळे तालुकाध्यक्ष भगवान पाटील बिनविरोध निवडून आले. याच पक्षाचे धुळे शहराध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी उघडपणे सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलविरोधात भूमिका घेत भाजपचे उमेदवार सुरेश रामराव पाटील यांचा पराभव केला. काँग्रेसमधील अशा या वेगवेगळ्या भूमिकांमुळे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले. काँग्रेसचा चांगला प्रभाव दिसत असूनही बँकेवर भाजपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडून आल्याची सल कार्यकर्ते व्यक्त करतात.

निवडणुकांत वेगवेगळ्या भूमिका

जिल्हा परिषदेच्या पंधरा जागांच्या पोटनिवडणुकीत मात्र महाविकास आघाडीद्वारे लढले गेले. यातील जागा वाटप काँग्रेस नेतृत्वाने केले. राष्ट्रवादी काँग्रेसने लढलेली कापडणे, मुकटी गटातील ही निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आणि या जागा निवडून आणल्या. साक्री येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. वास्तविक, साक्रीसह तालुक्यात काँग्रेसचे अस्तित्व नसताना केवळ बलाढ्य नाना नागरे यांच्या मतांवर परिणाम करणे आणि याद्वारे त्यांना काँग्रेसवर रिमोट कंट्रोल ठेवणाऱ्या एका बलाढ्य नेत्याच्या गटात ठेवण्यासाठी ही चाल खेळली गेली. अशा या विविध निवडणुकांमध्ये काँग्रेसची भूमिका सोयीप्रमाणे, निरनिराळी राहिल्याने अपेक्षाभंग झाल्याचे कार्यकर्ते बोलतात.

भाकरी फिरवावी

आमदार पाटील यांनी काही बेरजेचे राजकारणही केले. यात पूर्वाश्रमीचे कट्टर विरोधक शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना काँग्रेसमध्ये घेत धुळे शहराध्यक्ष पद बहाल केले. त्यामुळे शहरात थोड्याफार प्रमाणात पक्षात चैतन्य आहे. तसेच आमदार पाटील यांनी पूर्वाश्रमीचे कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे किरण पाटील व सौ. पाटील यांना जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून येण्यासाठी मदत केली. यातून विरोधक कमी करत आमदार पाटील यांनी धुळे ग्रामीणमधील पाय आणखी घट्ट रोवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्या प्रमाणे आमदार कुणाल पाटील यांनी शहरातील कार्यकारिणीत भाकरी फिरविली, तशी ती त्यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा कार्यकारिणीतही फिरवावी, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करतात. अनेक वर्षांपासून जिल्हाध्यक्ष असलेले सनेर यांच्या कार्यकाळात पक्ष संघटन, विस्तार, बळकटीकरण किती झाले, असा प्रश्‍न कार्यकर्ते उपस्थित करतात. पक्षाला जिल्ह्यात ऊर्जितावस्था हवी असेल तर कार्यकर्त्यांची अपेक्षापूर्ती व्हावी, अशी मागणी आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com