ACB Trap News: नाशिकच्या सहकार विभागात खळबळ; जिल्हा निबंधकाला तब्बल 30 लाखांची लाच घेताना अटक

Anti-Corruption Bureau : सतीश खरे यांना तब्बल 30 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले
ACB Trap News:
ACB Trap News:Sarkarnama

Nashik News: नाशिक सहकार विभागाचे जिल्हा निबंधक सतीश खरे हे लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे नाशिकच्या सहकार विभागात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक सहकार विभागाचे जिल्हा निबंधक सतीश खरे यांना तब्बल 30 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

ACB Trap News:
Pimpri-Chinchwad : खासदार कोल्हेंना धमकी देणाऱ्या पोलिसाला आयुक्तांनी पाठवले घरी

सतीश खरे यांच्या घरी ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. यावेळी सतीश खरे हे 30 लाख रुपयांची लाच घेतला रंगेहाथ आढळून आले.

ACB Trap News:
BJP News : कर्नाटक हातचे जाताच भाजपा हादरला; पक्षसंघटनेत हे बदल तातडीने होणार; शिंदे गटाचे वजन वाढणार...

दरम्यान, मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या तक्रारी प्रकरणी सुरू असलेल्या हेरिंगचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी सतीश खरे यांनी लाचेची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com