माजी आमदार आसीफ शेख यांचा गृहमंत्र्यां साकडे, `निरपराधांवर कारवाई करू नका`

माजी आमदार आसिफ शेख यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी निवेदन दिले.
माजी आमदार आसीफ शेख यांचा गृहमंत्र्यां साकडे, `निरपराधांवर कारवाई करू नका`
Ex MLA Asif Shaikh at HM Residence Sarkarnama

मालेगाव : त्रिपुरातील मुस्लिमांवर कथित अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंददरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिस प्रशासनाने फक्त दोषींवर कारवाई करावी. बंदला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व अन्य निरपराधांविरुध्द कारवाई करु नये, अशी मागणी माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष आसिफ शेख (Ex MLA Asif Shaikh) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील (home minister Dilip valse-patil) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Ex MLA Asif Shaikh at HM Residence
मालेगावचे नेते म्हणतात, दंगलखोर नव्हे ते तर मासूम है बेचारे!

श्री. शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबई येथील श्री. वळसे पाटील यांच्या शिवगिरी या निवासस्थानी निवेदन सादर केले. निवेदनात धार्मिक व सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या बंदला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. मात्र, मिरवणूक व मोर्चाला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नव्हता. बंद शांततेत पार पडल्यानंतर दुपारनंतर नवीन बसस्थानक परिसरात हिंसाचार घडला.

Ex MLA Asif Shaikh at HM Residence
महाराष्ट्राचा यूपी, बिहार झाला की काय? असे वाटायला लागले आहे!

यात काही समाजकंटकांचा व जिल्ह्याबाहेरील नागरीकांचा सहभाग नाकारता येत नाही. पोलिसांनी बंद आयोजकांच्या कार्यालयावर छापेमारी व अटकसत्र सुरु केल्याने पोलिसांविषयी शहरात असंतोष आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी फक्त दोषींवरच कारवाई करावी. निर्दोष असलेल्यांना नाहक ३६० व ३९५ च्या गुन्ह्यात अडकवू नये अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात मनपा सभागृहनेते अस्लम अन्सारी, माजी अध्यक्ष हाजी मोहम्मद युसूफ, फारुक शेख, अनीस अजहर, माजी नगरसेवक हिदायतुल्ला अन्सारी आदींचा समावेश होता.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in